Img 20191207 155458
ताज्या पनवेल सामाजिक

“कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत शाळेची फी मागू नये”- विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी

“कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत शाळेची फी मागू नये”- विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी

पनवेल/ प्रतिनिधी : 
संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सध्या लॉक डाऊन परिस्थिती आहे अशा वेळेस लोकांना घरात बसून राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत शाळेची फी मागू नये अशी मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी मागणी केली आहे.
लॉक डाऊन परिस्थितीमुले बहुतेकांचा रोजगार हा बंद झालाय. रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांना सध्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा मोठा प्रश्न समोर आहेत. अशा परिस्थितीमध्ये ज्या मुलांना राज्य शासनाच्या आदेशानुसार पुढील वर्गात प्रवेश दिला आहे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पुढील वर्षाची शाळेची फी भरण्यासाठी  जोपर्यंत सदर कोरोना आपत्कालीन परिस्थिती पूर्वपदावर  येऊन सर्वकाही सुरळीत होत नाही तोपर्यंत शाळेची फी भरण्यासाठी मुभा मिळावी असे विनंती पूर्वक आवाहन शाळा प्रशासनाला विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी केले आहे.
सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून अशा परिस्थितीत शाळा प्रशासन विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत उभी राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.