20200330 232809
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

संकटकाळी मदतीचा हात देऊन आधार देणारा स्तंभ म्हणजेच लोकनेते मा.खा. रामशेठ ठाकूर… पनवेल प्रेस कल्ब व मिडीया प्रेस क्लबच्या सदस्यांनी मानले आभार

संकटकाळी मदतीचा हात देऊन आधार देणारा स्तंभ
म्हणजेच लोकनेते मा.खा. रामशेठ ठाकूर

पनवेल प्रेस कल्ब व मिडीया प्रेस क्लबच्या सदस्यांनी मानले आभार

पनवेल/ प्रतिनिधी :
कोरोना covid – 19 या व्हायरसने जगभर हाहाकार माजविला असल्यामुळे जगभरातील आर्थिक व्यवस्था ढासळली आहे. भारतात देखील कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली असली तरी महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. या पार्शवभूमीवर दिनांक 20 मार्च पासून देशभरामध्ये लॉकडाउन केल्यामुळे आणि जागतिक मंदी आली असल्यामुळे पनवेलमधील पत्रकारांचा रोजगार दुरावला गेला. मात्र यावेळी पनवेल प्रेस क्लबचे संस्थापक विजय दा. कडू यांनी पुढाकार घेऊन पनवेल प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांसह पनवेल मीडिया प्रेस क्लबच्याही पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन लोकनेते मा. खा. रामशेठ ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी रामशेठ ठाकूर यांनीही परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून प्रेस क्लब आणि मीडिया प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांना सढळ हस्ते मदत केली. यावेळी पत्रकारांनी आपल्या परिवारांच्या वतीने रामशेठ ठाकूर यांचे आभार मानले. यावेळी संकटकाळी मदतीचा हात देऊन आधार देणारा स्तंभ म्हणजेच लोकनेते मा.खा. रामशेठ ठाकूर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल ही भावना पत्रकारांमध्ये निर्माण झाली.
संपूर्ण रायगड जिल्ह्यातील दानशूर व्यक्तीमत्व, रायगडचे भाग्यविधाते, गरिबांचे कैवारी लोकनेते मा. खासदार रामशेठ ठाकूर यांनी संपुर्ण जगात दशहत माजविणा-या दिवसात लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वर्तमान पत्राच्या प्रतिनिधींवर आर्थिक संकट आले, यावेळी वृत्त समूहात एक वेगळीच छाप उमटवून आपले हितसंबंध आणि सर्वांशी गोडवा त्यांनी जपून ठेवला. याचाच एक भाग म्हणजे राजकारणातील एक देव माणूस म्हणून आज रामशेठ ठाकूर यांना ओळखले जाते. चेहऱ्यावर कोणतीही चिंता न दाखविता आपले हसतमुख व दिलखुलास स्वभावावर सर्वच वृत्तपत्रे त्यांचा आदर करीत आहेत. किंबहुना काही मोजके वृत्तपत्र सोडल्यास सर्वांचेच ते पालनकर्ते म्हणूनच त्यांच्याकडे पहिले जाते. कोणतीही चिंता न बाळगता सढळ हस्ते स्वतः मदत करणारे आणि इतरांनाही मदत करायला लावणारे असे दातृत्व ज्यांच्याकडे देवाने दिले आहे अशा या महान नेत्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
यावेळी पनवेलमधील प्रेस क्लब आणि मीडिया प्रेस क्लबच्या सदस्यांना एकत्र आणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी देऊ केलेल्या मदतीसाठी पत्रकारांना एकत्र आणणारे प्रेस क्लबचे संस्थापक विजय कडू यांचेही सर्वच सदस्यांनी आभार मानले आहेत. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सढळ हस्ते प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत केल्यामुळे त्यांचे पनवेल प्रेस क्लबच्या वतीने शतशा मनपुर्वक आभार मानण्यात आले. यासाठी पनवेल प्रेस क्लबचे संस्थापक विजय कडू व अध्यक्ष सय्यद अकबर तसेच मीडिया प्रेस क्लबचे गणेश कोळी यांनी विशेष प्रयत्न केले त्यांचेही यावेळी आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 42 = 46