IMG-20210921-WA0028
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

शिवसेनेच्या दणक्यानंतर सिडकोने केली नागरी  सुविधांच्या कामाला सुरूवात

शिवसेनेच्या दणक्यानंतर सिडकोने केली नागरी  सुविधांच्या कामाला सुरूवात

पनवेल/ संजय कदम :
कळंबोली वसाहतीमध्ये अनेक नागरी सुविधा देण्यास सिडको असमर्थ ठरत होती. या संदर्भात शिवसेनेने दणका दिल्यानंतर तेथील रस्ते, पथदिवे व इतर कामांना सुरूवात करण्यात आली आहे.


जिल्हाप्रमुख शिरीष घरत व महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली आणि विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर व शहर प्रमुख डी.एन.मिश्रा व उपमहानगर समन्वयक आत्माराम गावंड यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली शहर समन्वयक गिरीश धुमाळ, शहर संघटक अक्षय साळुंखे, उपशहर प्रमुख  नारायण फडतरे, उपशहर प्रमुख सूर्यकांत म्हस्कर, विभाग प्रमुख आकाश विलास शेलार, विभाग प्रमुख  महेश गुरव, उपविभाग संघटक विकास मिश्रा, शाखा प्रमुख जयेश पार्टे, अमोल जठोत आदींनी सिडको अभियंता कांबळे यांनी भेट घेवून त्यांच्या समोर येथील समस्यांचा पाढा मांडला होता. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते, तसेच बंद पडलेले पथदिवे व इतर समस्यां संदर्भात चर्चा केली असता सदर कामे लवकरात लवकर सुरू करतो असे आश्‍वासन कांबळे यांनी दिले होते. त्यानुसार प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली असून काही भागात जोरात कामे सुरू झाल्याने येथील रहिवाशांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

42 + = 43