ताज्या पनवेल

पनवेल बंगाली संस्कृतीक संस्थेच्या वतीने पनवेल मधील पत्रकारांना अन्यधान्य वाटप

पनवेल बंगाली सांस्कृतीक संस्थेच्या वतीने पनवेल मधील पत्रकारांना अन्यधान्य वाटप

पनवेल/ संजय कदम :
कोरोनाच्या संकटाने व लोकडाऊनमुळे सर्वजणच आर्थिक विवंचनेचा सामना करीत आहे पनवेल परिसरातील पत्रकारही अपवाद राहिलेले नाहीत अशा परिस्थितीतही कोरोनाची परिस्थिती रोजच्या रोज जनतेच्या समोर मांडण्याचे काम पत्रकार करीत आहेत पत्रकारांची ही अडचण ओळखून पनवेल प्रेस क्लबचे संस्थापक तथा दै. वादळवाराचे संपादक विजय कडू अध्यक्ष सय्यद अकबर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टार पनवेल चे संपादक तथा पनवेल प्रेस क्लबचे उपाध्यक्ष अनिल राय यांच्या सहकार्याने पनवेल बंगाली संस्कृतीक संस्थेच्या संस्थापक एस आर शाह सेक्रेटरी सायबल दुबे सामाजिक कार्यकर्ते दिलीप चक्रवर्ती यांच्या वतीने पनवेल मधील पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
त्यात २५किलो तांदुळ १५किलो जेमीनी तेल अडीच किलो मुगडाळ डाळ इत्यादी वाटप करण्यात आले त्या वेळी ज्येष्ठ पत्रकार दै, “वादळवारा” चे संपादक तथा पनवेल प्रेस क्लबचे संस्थापक विजय कडू, अध्यक्ष तथा “कोकण डायरी” चे संपादक सय्यद अकबर, स्टार पनवेलचे संपादक तथा उपाध्यक्ष अनिल राय, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनवणे, जेष्ठ पत्रकार गणेश कोळी, पत्रकार संजय कदम, पत्रकार मंदार दोंदे, विवेक पाटील,वचन गायकवाड, संतोष भगत, हरेश साठे, गणपत वारगडा, संतोष वाव्हळ, क्षितिज कडू आदि पत्रकार उपस्थित होते.

Avatar
गणपत वारगडा
संपादक: आदिवासी सम्राट
https://adivasisamratnews.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *