“कोविड-19- करोना विषाणू”
काळजी करू नका.. काळजी घ्या !
जिल्ह्यात 538 जणांनी केली करोनावर मात; सध्याची रुग्ण संख्या 375
अलिबाग/ जिमाका :
स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 538 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 56 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-155, पनवेल ग्रामीण-59, उरण-22, खालापूर-5, कर्जत-15, पेण-3, अलिबाग-24, मुरुड-9, माणगाव-34, तळा-6, रोहा-17, सुधागड-1, श्रीवर्धन-4, म्हसळा-5, महाड-1, पोलादपूर-12 अशी एकूण 375 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-272, पनवेल ग्रामीण 114, उरण-130, खालापूर-2, कर्जत-3, पेण-2, अलिबाग-6, माणगाव-1, तळा-1, श्रीवर्धन-5, महाड-1, पोलादपूर-1 अशी एकूण 538 आहे. आज दिवसभरातही पनवेल मनपा-20, पनवेल ग्रामीण-6, उरण-3, अलिबाग-3, माणगाव-1 असे एकूण 33 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-21, पनवेल ग्रामीण-7, खालापूर-1, कर्जत-2, अलिबाग-2, मुरुड-2, श्रीवर्धन-2, म्हसळा-2, महाड-3, पोलादपूर-1 असे एकूण 43 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-29, पनवेल (ग्रा)-12, कर्जत-1, पेण-2, अलिबाग-1, मुरुड-5, माणगांव-1, तळा-1, रोहा-3, म्हसळा-1 अशा प्रकारे एकूण 56 ने वाढ झाली आहे. आजच्या दिवसातील पनवेल मनपा क्षेत्रातील 2 व्यक्तींची मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातून 3 हजार 266 नागरिकांचे SWAB कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तपासणी अंती त्यापैकी 2 हजार 240 नागरिकांचे रिपोर्ट ‘-’ ve प्राप्त झाले आहेत तर तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 70 आहे.