20200616 092017
अलिबाग कोकण ताज्या महाराष्ट्र रायगड सामाजिक

श्रीवर्धन तालुक्यातील दांडा, गाळचुरे आदिवासीवाडीला मिळाले; पनवेल ग्रामसेवक संघटनेचा आधार… पनवेल तालुका ग्रामसेवक संघटनेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

श्रीवर्धन तालुक्यातील दांडा, गाळचुरे आदिवासीवाडीला मिळाले; पनवेल ग्रामसेवक संघटनेचा आधार

पनवेल तालुका ग्रामसेवक संघटनेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


पनवेल/प्रतिनिधी :
निसर्ग चक्री वादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली अनेकांचे संसार उघडयावर पडले आहेत घरात असेल नसेल त्या धान्यासकट सगळे उद्वस्त झाले. या कुटुंबाना तातडीची मदत म्हूणन पनवेल तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दांडा, गाळचुरे आदिवासी वाडीत करण्यात आले. कोरोना या संसर्ग जन्य आजाराची टांगती तलवार असतानाच अगोदरच लॉकडाऊन मुळे हातात काम नसल्याने अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, त्यातच ३ जून ला निसर्ग चक्री वादळ येऊन धडकले या मध्ये मोट्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले घरात असलेले धान्य हि पावसामुळे घर उघड्यावर पडल्याने खराब झाले आता खायचे काय?? असा प्रश्न या नागरिकांसमोर असतानाच पनवेल तालुका ग्रामसेवक संघटना या वादळग्रस्तांच्या मदतीला धावून गेली. त्यांनी तातडीने ४०० हुन अधिक जीवनावश्यक किट श्रीवर्धन मधील दांडा ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये पाठवून त्यांना आधार दिला आहे.
ग्रामीण भागातील जीवनमान, ग्रामीण भागातील नागरिकांचे उत्पन्न व परिस्तिथी याची माहिती ग्रामसेवकांना असते, त्यांच्या खडतर जीवनाची कल्पना असल्याने पनवेल तालुका ग्रामसेवक संघटना यांनी निसर्गचक्री वादळामुळे लोकांचे किती नुकसान झाले असेल याची जाणीव ठेऊन सामाजिक जबाबदारी म्हणून श्रीवर्धन तालुक्यात जीवनावश्यक वस्तूंचे तातडीने वाटप केल्याची माहिती पनवेल तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष निलेश म्हसकर यांनी दिली .
यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य अधिकारी शीतल फूंड, गटविकास अधिकारी संजय भोई, संघटनेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब गोल्हार तसेच ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .