20230118 095433
उरण कर्जत पनवेल सामाजिक

पनवेलच्या ग्रामीण क्रिकेटमधून होते करोडोंची उलाढाल, ग्रामीण क्रिकेटला सुगीचे दिवस

पनवेलच्या ग्रामीण क्रिकेटमधून होते करोडोंची उलाढाल, ग्रामीण क्रिकेटला सुगीचे दिवस

पनवेल/ प्रतिनिधी :
डिसेंबर, जानेवारी महिना उजाडला की, ग्रामीण भागातील युवकांना वेध लागतात ते क्रिकेटचे. या क्रिकेटमधून दरवर्षी करोडो रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे पनवेल तालुक्यातील ग्रामीण क्रिकेटला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. ग्रामीण क्रिकेट सामन्यांचे लाईव्ह वर्णन यु ट्यूबवर केले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस ग्रामीण क्रिकेटची लोकप्रियता वाढत चालली आहे. प्रेक्षकांची मोठी पसंती ग्रामीण क्रिकेटला मिळत आहे.
20230118_095415क्रिकेट म्हटले कि, लहानापासून आबालवृद्धांपर्यंत या खेळाची प्रचंड ओढ असते. पनवेलच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे टॅलेंट लपलेले आहे. मात्र त्यांना बाहेर काढण्याची गरज असून यासाठी त्या प्रमाणात वातावरण निर्मिती केली जात आहे. नोव्हेंबर ते एप्रिल मे महिन्यापर्यंत करोडो रुपयांची उलाढाल या क्रिकेटच्या सामन्यात होत असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी या सामन्यांना पहावयास मिळत असते. पाच ते आठ हजारोंच्या संख्येने प्रेक्षक सामने पाहण्यासाठी व आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी हजर असतात. ग्रामीण सामने दिवसेंदिवस लोकप्रिय ठरू लागले आहेत. रात्री खेळविल्या जाणाऱ्या सामन्यांतून लाखो रुपयांच्या बक्षिसांची लूट केली जाते. याशिवाय सलग चौकार, षटकार व विकेट घेणाऱ्या स्पर्धकांना हजारोंची बक्षिसे लावली जातात.           

20230118_095510  पावसाळा संपल्यावर साऱ्यांनाच क्रिकेटचे वेध लागतात. ग्रामीण भागात लाखो रुपयांच्या क्रिकेट स्पर्धा सुरु झालेल्या आहेत . दिवसाच्या सामन्यांसह रात्रीचे सामने देखील पनवेल तालुक्यात लोकप्रिय ठरू लागले आहेत. त्यातून खेळाडूना व विजयी संघाला लाखोंची बक्षिसे दिली जातात. त्यामुळेच ग्रामीण भागातील सामन्यांना प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यामधूनच नवीन उद्योन्मूख क्रिकेटपटूंना संधी मिळणार असल्याचे मत आयोजक व्यक्त करत आहेत. आपल्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात क्रिकेट दडलेला असून त्याला संधीची गरज आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळला जात आहे. तालुक्यातील महिला देखील ग्रामीण क्रिकेटच्या प्रेमात पडल्या आहेत. उंचच उंच चषक स्पर्धेतील विजयी संघास दिले जातात. काही सामन्यांमध्ये चीअर गर्ल देखील आणण्यात येतात. त्यामुळे ग्रामीण सामन्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. adivasi logo new 21 ok (1)