आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू
पनवेल/ प्रतिनिधी :
प्रत्येक समाजात गोरगरिबांची मुले जेमतेम १० वी, १२ वी पर्यंत शिक्षण घेत असतात, पुढे आर्थिक अडचणी असल्यामुळे गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत नाहीत. तर एकीकडे आर्थिक परिस्थिती चांगली असून ही बी.ए., बी.काॅम, बी.एस्सी पदव्या घेता येत नाही, कारण पैसा आहे पण दररोज काॅलेजमध्ये जाण्यासाठी वेळ नाही. नोकरी प्रमोशनासाठी पदवी नाही, यासारखे अनेक अडचणी असतात. या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी आणि गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थी शिकला पाहिजे म्हणून शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना केली. त्यामुळे या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात शिक्षण घेऊन अनेकांनी पदव्या घेतल्या आणि नोक-या ही मिळवल्या. परंतु यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या मोजक्याच शाळा, काॅलेजना मान्यता मिळाली होती.
माञ, आता रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा व जुनिअर या नामांकीत असणारी शाळेला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक यांची मान्यता मिळाली असल्याने पनवेल तालुका व जवळच्या तालुक्यातील असणा-या विद्यार्थांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण घेणं सोपं व सोयीस्कर झाले आहे. तरी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी गोरगरिब विद्यार्थींनी प्रवेश घ्यावा असे आवाहन ही शाळेचे चेअरमन अनंता लक्ष्मण धरणेकर यांनी केले आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यात शिक्षणाचा टप्पा अधिक वाढणार हे निश्चित आहे.