Img 20201110 Wa0007
कर्जत ताज्या सामाजिक

कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था

कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था

नागरिकांची होतेय गैरसोय; ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज

कर्जत/ मोतीराम पादिर :
कर्जत तालुक्यातील कशेळे हे मोठे गाव आहे. कशेळे गावात मोठी बाजारपेठ भरवली जात असते या बाजारपेठेत बहुसंख्याने लोक व व्यापारी खरेदी व विक्रीसाठी येत असतात. पण या बाजारपेठेत येणाऱ्या नागरीकांची व महिलांची बाथरूमाची मोठी गैरसोय होत आहे. कशेळे मुख्य बाजारपेठेत कशेळे ग्रामपचायात यांच्या मार्फत काही वर्षा पूर्वी बाथरूमाची व्यवस्था केली होती. पण, त्या बाथरुमाचे बांधकाम झाल्यापासून परत कधी लक्ष दिले नसेल अशा अवस्थेत ते आज ही बाथरूम दिसत आहे. “स्वच्छा भारत, सुंदर भारत” तसेच हागाणदारी मुक्त गाव” या वाक्याचा आर्थच कुठे दिसून येत नाही.
कर्जत रोडला जे बाथरूम आपल्याला दिसत असेल त्यांच्या चारही बाजूने गवत व घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. त्या बाथरूमाच्या आत मध्ये खुपच घाणवास येत आहे बाथरुमाच्य आत मध्ये दारुच्या बाटल्या. घाण वस्तू फेकून दिल्या आहेत त्या ठिकाणी जातानी नाकाला हात लावून जावे लागते. त्यालाच लागून स्त्रीयांसाठी वेगळे बाथरूम बांधण्यात आले आहे. त्या बाथरुमाला दरवाजे किवा कुठलाच आडोसा किवा आतल्या बाजूस दरवाजे बसवले नाही आशा परिस्थित महिलांनी बाथरूमला जायाचे कुठे?? आशा प्रश्न बाजारात येणाऱ्या महिलांना पडत असतो. या प्रकारे बाजारात येणारे नागरिक व व्यापारी यांची मोठ्या प्रमाणात गयसोय होत आहे. त्यांना आशा वेळी बाहेर बाथरूमला बसावे लागत आहे. आपला चांगला परिसर अस्वच्छ होताना दिसत आहे.
कशेळे बाजारपेठेत येणारे नागरीकांची कशेळे ग्रामपंचायत सरपंच व प्रशासनाला एकच विनंती आहे त्यांनी या कडे लक्ष द्यावे. हि नागरिकांची मांगणी आहे या बाथरुमाची जी दुरावस्थ आहे. ती साफ सफाई करून पूणा त्या बाथरुमाला नविन रूप द्यावे व महिला बाथरूम मध्ये दरवाजे बसवून घ्यावे व वापरण्या योग्य बनवावे. नागरिकांची व व्यापाऱ्याची होणारी गैरसोय दुर करावी अशी मागणी येथील नागरिकांडून केली जाते.