20201215 092344
कर्जत ताज्या सामाजिक

खड्डे भरण्याच्या नावाने ठेकेदाराकडून लाखो रुपयांचा चुराडा

खड्डे भरण्याच्या नावाने ठेकेदाराकडून लाखो रुपयांचा चुराडा

कर्जत/ मोतीराम पादिर :
रस्त्यांच्या दुरुस्तीच्या नावे ठेकेदारांनी शासनाची फसवणूक चालवली आहे कर्जत तालुक्यातील अनेक रस्त्यांची दैयनिय अवस्था झाली आहे मात्र याच रस्त्यामध्ये पडलेले खड्डे आणि उखडलेला रस्ता यांना जबाबदार हे निकृष्ट दरर्जांचे काम करणारे ठेकेदार असून त्यांच्यावर ठोस कारवाही करून खड्डे भरण्याच्या नावाने चाललेली लाखो रुपयांची लुट थांबवून दर्जेदार रस्ते व्हावेत अशी मागणी जोर धरत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग आलिबाग अंतर्गत ताडवाडी मोरेवाडी कुरुंग व वारे या गावाला जोडणारा मधल्या रस्ताचे काम निकृष्ट दरर्जेचे काम केले आहे. या नावाखाली लाखो रुपयांचा चुराडा केला असल्याचे उघडकीस आले असून मागील वर्षी या रस्त्यावरील काम केले होते. कर्जत तालुक्यात खेड्यापाड्यातील रस्त्यावर खड्याची चाळण झालेली असून रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता तर काहि ठिकाणी रस्ता चोरीला गेला की काय?? अशी नागरिकामध्ये चर्चा आहे. आलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाने ठराविक ठेकेदारांना पोसण्यासाठी हे खड्डे भरण्याचे काम मागील वर्षी दिले होते.
मात्र, मलमपट्टी व्यतिरिक्त उपाययोजना न केल्याने मोरेवाडी, ताडवाडी, कुरंग, वारे या गावाचा मधल्या रस्त्यावरील पडलेले खड्डे व उकडलेली खड्डी पूर्ववत निर्माण झाल्याने या खड्डे बुजवाबुजवी करण्या ऐवजी कायमचे उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरीक करत आहेत. त्या रस्त्यवर गाडी चालावणे सोडा चालणे सुद्धा कठिण होऊन जाते. त्या रस्ताने गाडी घेऊन जाताना भिती वाटायला लागते. कधी पडतो की काय? अशी अवस्था त्या रस्ताची झाली आहे.