आदिवासी वाड्यांच्या मागण्या पूर्ण करा नाही तर प्रजासत्ताक दिवशीच अत्मदहन करू; आदिवासींनी दिला प्रशासनाला इशारा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझ्या जन्मापासून या डोंगरपट्ट्यात रस्ते लाईट पाणी या समस्या भेडसावत आहेत. आमचा रस्ता दरवर्षी पावसात वाहून जातो दरवर्षी आमच्या लोकांना जाण्या येण्याचा त्रास सहन करावा लागतो. फॉरेस्टर भाग असल्यामुळे पक्का रस्ता बनवण्यासाठी विरोध केला जात आहे. आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर आम्ही अत्मदहान करू.
– जैतू पारधी, अध्यक्ष
आदिवासी सेवा संघ, तालुका कर्जत
~~~~~~~~~~~~~~~~~~
कर्जत/ प्रतिनिधी :
कर्जत तालुका आदिवासी मागसवर्गीय भाग अशी ओळख आहे. आदिवासी बहुल समाज हा दळण वळणाच्या साधना पासून अजून कोसो दूर आहे. नेरळ डोंगर पट्ट्यातील बहुतेक आदिवासी वाड्यांचे रस्ते नादुरुस्त झाल्याने शहरापासून आदिवासी वाड्यांचा प्रवास तुटला आहे. आदिवासी लोकांना रस्त्याविना प्रवास करावा लागत आहे. तसेच प्रशासनाला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अत्मदहान करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मागील वर्षी जुलै महिन्याच्या मुसळधार पावसाने बेकरेवाडी, असलवाडी, नाण्याचामाळ धनगरवाडा, भुतिवली धामणदांड, सागवाडी, चिचवाडी, आषाणेवाडी, सावरगाव, किरवली ठकुरवाडी या गावाला जोडणारा माथेरान मुख्य रस्ता जुम्मापट्टी गावापासून जात असून पुढील रस्ता धनगरवाडा येथून जुलै महिन्याच्या मुसळधार पावसाने वाहून गेल्याने वरील आदिवासी वाड्यांमध्ये जाण्या-येण्यासाठी सर्व आदिवासी वाड्याना खुप त्रास होत आहे.
भारताच्या अमृत महोत्सव साजरा होत असताना आमच्या आदिवासी वाड्या मूलभूत सुविधे पासून वंचित राहिले आहे. प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार करून शुद्धा जाग आलेली नाही परिणामी आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी, गणेश पारधी येत्या प्रजासत्ताक दिनी आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर २६ जानेवारी रोजी दुपारी १२.०० वाजता रोजी आत्मदहन करणार असल्याचे समजते.