ताज्या नवी मुंबई पनवेल

अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटार सायकलस्वाराचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटार सायकलस्वाराचा मृत्यू

पनवेल/ प्रतिनिधी :
एका अज्ञात वाहनाची धडक मोटार सायकलला बसल्याने त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील मुंबई-पुणे जुना हायवे रोडवर वेलवेट हॉटेलच्या समोर कोळखे गावाच्या परिसरात घडली आहे.
मोटार सायकलस्वार अशोककुमार रामलोटन गुप्ता (51) हे त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल क्र.एमएच-43-बीएल-6574 हे मुंबई-पुणे जुना हायवे रोडने जात असताना हॉटेल वेलवेटच्या समोर पुणे बाजूकडे त्यांच्या मोटार सायकलला कोणत्या तरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते गंभीररित्या जखमी होवून त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

गणपत वारगडा
संपादक: आदिवासी सम्राट
https://adivasisamratnews.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *