IMG-20220825-WA0011
अलिबाग कोकण खालापूर ताज्या दिल्ली नवी मुंबई पनवेल पालघर महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक सुधागड- पाली

स्वदेश फाउंडेशनने सुधागड – पालीतील कासारवाडीला बनवले स्वप्नातील गावं

स्वदेश फाउंडेशनने सुधागड – पालीतील कासारवाडीला बनवले स्वप्नातील गावं

गाव विकास समिती व शासकीय विभागांचा सहभाग..

IMG-20220825-WA0027

सुधागड पाली/ प्रतिनिधी :
स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून स्वप्नातील गाव म्हणून घोटावडे कासारवाडी हे गाव घोषित करण्यात आले. या निमित्ताने घोटावडे कासारवाडी येथे बुधवार (दि. २४ ऑगस्ट २०२२) रोजी स्वदेश फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांच्या उपस्थित कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व स्त्री पुरुष लहान थोर वयोवृध्द सर्व लोक अतिशय आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले होते सर्व लोक. यावेळी ग्रामस्थांनी वेगवेगळी आदिवासी गाणे आनंद नृत्य सादर करून आनंद साजरा केला.
IMG-20220825-WA0015स्वदेश फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली गावात ३ वर्षांपूर्वी संपूर्ण गावाला एकत्रित करून गाव विकास समिती स्थापन करण्यात आली होती. “गाव विकास समिती, स्वदेस फाउंडेशन व शासन यांच्या माध्यमातून मागील ३ वर्षांपासून गावात हरित क्रांती, वृक्ष लागवड, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, पथदिवे, हागणदारी मुक्त गाव, शासकीय पेन्शन, शासकीय मूळ कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, महिला बचत गट, आर्थिक साक्षरता प्रशिक्षण, घरकुल योजना, करिअर मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल शाळा, समृद्ध अंगणवाडी, सौर पथदिवे, १००% कुटुंबांना सौरऊर्जा सर्व कुटुंबांचा आरोग्य विमा अशा अनेक उपक्रमातून गाव आदर्श बनविले. या गावासाठी स्वदेस फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विकास कामांसाठी ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला. या कार्यक्रमाप्रसंगी गाव विकास समितीतील काही सदस्यांनी त्यांचा आदर्श गावाचा प्रवास कसा होता या विषयीचा अनुभव सांगितला. हे गाव आता संपूर्ण भारत देशामध्ये घोटावडे कासारवाडी या गावाचे नाव कसे होईल यासाठी प्रयत्नशील आहे.
IMG-20220825-WA0038या कार्यक्रमासाठी सुधागड तालुक्याचे तहसीलदार श्री. दिलीप रायन्नावर, गट विकास अधिकारी विजय यादव, सहाय्यक गट विकास अधिकारी अशोक महामुनी, माजी सभापती पी. डी. ढुमना, सरपंच पारुताई चौधरी, गटशिक्षण अधिकारी साधुरं बांगरी, पशु वैद्यकीय अधिकारी प्रशांत कोकरे, आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र अध्यक्ष पञकार गणपत वारगडा, ठाकूर समाज संस्थेचे अध्यक्ष मालू निरगुडा, आदिवासी समाज संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जयवंत शिद, खालापूर तालुका अध्यक्ष विष्णू खैर, पांडूरंग पारधी, अंकुश वाघ, अध्यक्ष सुधागड तालुका मराठा समाज योगेश मोरे, ग्रामसेवक सुनील पानसरे, पोलीस पाटील वामन सुतक, प्रकाश ढुमणा, गणेश केवारी आदी. उपस्थित होते.
IMG-20220825-WA0024तसेच स्वदेस स्वदेस फाउंडेशन संस्थेचे संचालक राहुल कटारिया, महाव्यवस्थापक अफशान शेख, वरिष्ठ व्यवस्थापक शिवदास वायाळ, व्यवस्थापक भावना पांडे, व्यवस्थापक समीर शेख, सुश्मिता मूर्ती, सुजित ऐल, नागेश लाडगे, श्रीधर कोकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
IMG-20220825-WA0028सदर कार्यक्रमासाठी गाव विकास समितीचे अध्यक्ष हर्षा ढूमना आणि प्रकाश ढूमना यांनी केले. तसेच गाव विकास समितीचे सदस्य देवेंद्र ढूमणा, पारू हिरवे, मनीषा शेंडे, अक्षय शेंडे, विष्णू ढूमणा यांनी मागील तीन वर्षांचा प्रवास व त्याप्रवासा दरम्यान लाभलेले स्वदेश फाउंडेशन, शासन व इतर संस्थांच्या माध्यमातून त्यांनी गावाचा कसा कायापालट केला त्याबद्दल सविस्तर माहिती मान्यवरांना दिली. तसेच कार्यक्रमाप्रसंगी सर्व मान्यवरांनी ग्रामविकास समिती आणि ग्रामस्थांचे तोंड भरून कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

adivasi logo new 21 ok (1)