महाशिवरात्रीच्या निमित्ताने “अमर वाईन” च्यावतीने मिल्क शेकचे वाटप
रसायनी/ आनंद पवार :
महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंगळवारी सर्वत्र ठीक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मागील दोन वर्षापासून कोरोनाचे महाभयंकर संकट असल्यामुळे सर्वच सण व उत्सव साजरे करण्यावर बंदी होती. मंदिरही बंद असल्याने असंख्य भाविकांना आपल्या देवतांचे दर्शन घेणे कठीण होऊन बसले होते. आता कोरोणाचा प्रार्दुभाव कमी झाल्याने आणि राज्य सरकारने निर्बंध हटवल्याने तब्बल दोन वर्षांनंतर महाशिवरात्री सर्वत्र मोठ्या प्रमाणात व आनंदीमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
महाशिवरात्री दिनाचे औचित्य साधुन नवीन वसाहत येथील अमर वाईन शॉपचे मालक मनोहर परमानंद चेलानी यांनी अपूर्वा हॉटेल समोर गुलाब मिल्कशेक चे वाटप केले.
यावेळी बहुसंख्य नागरिकांनी या मिल्क शेकचा लाभ घेतला मनोहर चेलानी यांनी प्रथमच हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक तनवानी, संदीप लखपती, सुमीत, सोमनाथ, हरिभाऊ आदींनी परिश्रम घेतले