Img 20220302 Wa0024
ताज्या पनवेल

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस ॲक्शन मोडवर… पनवेल विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये स्मार्ट सोसायटी स्पर्धेला प्रारंभ

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस ॲक्शन मोडवर

पनवेल विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये स्मार्ट सोसायटी स्पर्धेला प्रारंभ

सात लाख रुपयांच्या बक्षिसांची बरसात होणार !

————————
सहकारी गृहनिर्माण संस्थांकरिता अशी “स्मार्ट सोसायटी स्पर्धा” ही संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे. त्यामुळे ही स्पर्धा एकमेव असल्याने सहकार खात्याचे निश्चितच लक्ष वेधणारी असेल शिवाय भविष्यात अन्य शहरांमध्ये राबविण्यासाठी याचे अनुकरण केले गेले तर या स्पर्धेला “पनवेल पॅटर्न” म्हणून निश्चितच प्रसिध्दी मिळेल असा मला विश्वास वाटतो.
– भाई आर सी घरत, अध्यक्ष
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी.
———————–

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि तालुका काँग्रेस यांच्या वतीने पनवेल विधानसभा मतदार संघ कक्षेतील सोसायट्यांकरता स्मार्ट सोसायटी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बुधवार दिनांक २ मार्च रोजी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर सी घरत यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत पत्रकार परिषद घेऊन या स्पर्धेची घोषणा केली. यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कमांडर कलावंत, सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड, पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष अरविंद सावळेकर, महिला आघाडी अध्यक्ष निर्मलाताई म्हात्रे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे, काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमाती विभागाचे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष मोहन गायकवाड,जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाचे कार्याध्यक्ष ऍड अरुण कुंभार, सांस्कृतिक सेल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राकेश चव्हाण उपस्थित होते.
जसजशा सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या वाढत आहे. तसतशा त्यांच्या समस्यांमध्ये देखील भरच पडत आहे. एक सुसंस्कृत उत्कृष्ट सहकारी गृहनिर्माण संस्था कशी असावी? याचे उत्तम उदाहरण शोधण्याकरिता व त्याचा आदर्श इतर संस्थानी घ्यावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सर्व संस्था, त्याचे पदाधिकारी व सदस्य यांच्यातील संबंध कसे सौहार्दाचे असावेत या साऱ्याची जाण अशा सहकारी गृहनिर्माण संस्थांना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना व्हावी हा देखील उद्देश आहेच.या स्पर्धेची सुरुवात २ मार्च २०२२ पासून सुरू झालेल्या स्पर्धेची ३१ मार्च २०२२ ही स्पर्धेत सहभागी होण्याची अंतीम तारीख असणार आहे. विविध सोसायट्यांच्यात जाऊन त्यांना स्पर्धा समजून सांगायचे व त्यांना सहभागी करून घेण्याची जबाबदारी सोसायटी किंगडम या संस्थेला देण्यात आलेली आहे. या एक महिन्याच्या कालावधीत सोसायटी किंगडमचे प्रतिनिधी प्रत्येक संस्थेत जाऊन या स्पर्धेत सहभागी होण्याबद्दल पत्रकाद्वारे जागृती करतील, स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी ठरविलेल्या निकषांबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना अवगत करून देतील.
या स्पर्धेत सहभागी होणा-या संस्थाकरिता सभासद संख्येनुसार गट पाडले जातील ‘अ’ गट यामध्ये ५० सदस्य संख्या असणाऱ्या संस्था ‘ब’ गट- यामध्ये ५१ ते १५० सदस्य संख्या असणाऱ्या संस्था व ‘क’ गट यामध्ये १५१ पेक्षा जास्त सदस्य असणाऱ्या संस्था अशी गटवार विभागणी असेल. क गटातील विजेत्या स्मार्ट सोसायटीला रुपये ५१ हजार सन्मानपत्र आणि चषक देण्यात येईल, ब गट विजेत्या स्मार्ट सोसायटीला रुपये २५ हजार प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येईल, तर अ गटातील स्मार्ट सोसायटीला रुपये २१ हजार प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.
शिवाय पनवेल – नवनि पनवेल खादा कॉलनी (आसूडगावसह). कळंबोली – कामोठे- खारगर व नावडे, तळोजा फेज १ व २ (प्रभाग १ व २) ही सात पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शहरे याशिवास ४ जिल्हा परिषद हद्दीतील व पनवेल विधानसभा क्षेत्रातील आदई , विचुंबे,उसर्ली, सुकापूर, आकुर्ली, कोप्रोली, नेरे, करंजाडे, पळस्पे इ. नागरी वस्त्या असणारी गावे असे एकूण ८ विभागांकरिता स्वातंत्रपणे स्पर्धा असणार आहेत. प्रत्येक विभागवार रोख रक्कमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. महाराष्ट्र शासन, सिडको प्रशासन व पनवेल महानगरपालिका प्रशासनाकडे सोसायट्यांच्या प्रलंबित समस्या सोडवून घेण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांना संगठीत करणे हा एकमेव उद्देश या स्पर्धेच्या आयोजनासाठी असल्याचे आर सी घरत यांनी सांगितले.
————————–

विजेता निवडीचे प्रमुख निकष –

★ संस्थांची वार्षिक सभा पदाधिकारी व सभासदांचे एकमेकातील संबंध
★ इमारतीचा विमा संस्था नोंदणी व कन्व्हेन्स डीड
★ सामाजिक उपक्रमातील संस्थेचा सहभाग ★ पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी केलेल्या उपाय योजना
★ सुका कचरा / ओला कचरा यांचे विलगीकरण
★राष्ट्रीय सणात सहभाग
★कोरोना काळातील काही विशेष
कार्य (असल्यास)
या प्रमुख निकषासह छोटया-मोठया विषयावर आधारीत एका प्रश्नावलीच्या आधारे सोसायटी किंग्डम चे परिक्षक पाहणी करून अहवाल तयार करतील.या अहवालाच्या आधारे सहकार क्षेत्रातील सेवानिवृत्त अधिकारी विद्यमान अधिकारी व कर्मचारी यांची मदत घेऊन निकाल तयार केला जाईल व कोणतीहि तांत्रिक अडचण न आल्यास महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर १ मे २०२२ रोजी निकाल जाहीर करणे व बक्षिस समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 + 1 =