Img 20220305 Wa0022
कर्जत ताज्या नवी मुंबई पनवेल पनवेल महाराष्ट्र सामाजिक

पेण प्रकल्प कार्यालयाचा अजब प्रकार; आदिवासी विकास विभागाचा निधी खर्च केला जातोय बिगर आदिवासींवर?… कृषी विभागामार्फत पनवेलमध्ये रायगड जिल्हा तांदूळ व धान्य महोत्सवाचे केले आयोजन; मात्र आदिवासी समाज महोत्सवापासून वंचित वर्षानू वर्षे निधी अभावी आदिवासी भागात कामे होत नाहीत. माञ, इथे २ दिवसात निधी कसा मिळतोय??? असा प्रश्न पडत फक्त आदिवासींचा निधी लाटण्याचाच उद्देशाने असे उपक्रम राबिवले जातात. आणि आदिवासींचा निधी लाटला जातोय. – नितीन निरगुडा, कर्जत तालुकाध्यक्ष, अ.भा.आ.वि.प.

पेण प्रकल्प कार्यालयाचा अजब प्रकार; आदिवासी विकास विभागाचा निधी खर्च केला जातोय बिगर आदिवासींवर?

कृषी विभागामार्फत पनवेलमध्ये रायगड जिल्हा तांदूळ व धान्य महोत्सवाचे केले आयोजन; मात्र आदिवासी समाज महोत्सवापासून वंचित

वर्षानू वर्षे निधी अभावी आदिवासी भागात कामे होत नाहीत. माञ, इथे २ दिवसात निधी कसा मिळतोय??? असा प्रश्न पडत फक्त आदिवासींचा निधी लाटण्याचाच उद्देशाने असे उपक्रम राबिवले जातात. आणि आदिवासींचा निधी लाटला जातोय.
– नितीन निरगुडा, कर्जत तालुकाध्यक्ष, अ.भा.आ.वि.प.

पनवेल/ प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) रायगड व प्रकल्प अधिकारी-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, यांचे संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा तांदूळ व धान्य महोत्सवाचे आयोजन दिनांक 4  ते 6 मार्च 2022 रोजी सकाळी 10 ते  सायंकाळी 6 वेळेत गुजराती शाळा, डॉ.आंबेडकर रोड, जुने पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे.
               तांदूळ, कडधान्य व भाजीपाला विक्री दालने, सेंद्रिय शेतकरी गटांची शेतमाल विक्री, महिला बचत गट उत्पादने-मसाला, पापड, लोणची इ. प्रदर्शन व विक्री तसेच शेतकऱ्यांसाठी कृषी तंत्रज्ञान परिसंवाद व चर्चा सत्र ,शेतकरी उत्पादक ग्राहक परिसंवाद त्याचबरोबर कृषी विभागाच्या विविध योजनांचा प्रसार ही या प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
या महोत्सवात महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून खरीप हंगामात विविध योजनेअंतर्गत भात पीक प्रात्यक्षिकामधून उत्पादित झालेले लाल, काळा, जांभळा भात तसेच इतर सुवासिक- इंद्रायणी, बारीक जातीच्या- वाडा कोलम ,शुभांगी वाय एस आर इ.तांदळाची थेट शेतकऱ्यांकडून योग्य दरात ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच रब्बी हंगामात उत्पादित कडधान्य तसेच भाजीपालाही थेट शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी उत्पादित केलेले विविध जातींचे तांदूळ, भाजीपाला, कंदमुळे ,कडधान्य इत्यादी उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. विविध महिला बचत गटांची उत्पादने व त्यांचे प्रदर्शनही ग्राहकांसाठी या महोत्सवात प्रमुख आकर्षण असणार आहे. या महोत्सवात भेट देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाबाबत विविध परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.           

तरी पनवेल शहर व परिसरातील सर्व ग्राहक तसेच शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासन -कृषी विभागामार्फत आयोजित महोत्सवात सहभागी होऊन विकेल ते पिकेल-थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पना साखळी विकसित करावी व जास्तीत जास्त शेतकरी उत्पादनांची खरेदी करावी असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद नवी दिल्ली संघटनेचे कर्जत तालुका अध्यक्ष नितिन निरगुडा यांनी भेट दिली. तर या महोत्सवात आदिवासी विकास विभागाचा निधी खर्च केला आहे. परंतु, त्या आदिवासी समाजाचा एकही बचतगट किंवा कोणताही शेतकरी या महोत्सवात सहभागी नाही. मग नेमका महोत्सव कोणासाठी??? असा प्रश्न विचारला असता. उडवाउडवीची उत्तरे देऊन आम्ही सर्वत्र माहिती प्रसिद्ध केली होती असे अधिकारी सांगण्यात आले. तसेच कृषी विभागाने दोन दिवसात पत्र काढून लगेच महोत्सव भरून घेतला व तात्काळ निधी आदिवासी विकास विभागाने दिला असल्याने आदिवासी समाजामध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. वर्षे न वर्षे निधी अभावी कामे होत नाही. माञ, इथे २ दिवसात निधी कसा मिळतोय??? आदिवासी बचतगट व शेतकरी यांच्याशी चर्चा केली असता आम्हाला या विषय काही माहिती नाही असे समजले. मग नक्की महोत्सव कोणासाठी हा प्रश्न पडला आहे.