20240508_101939
कर्जत कोकण खारघर ताज्या नवीन पनवेल महाराष्ट्र सामाजिक

खारघर-कामोठेत आदित्य ठाकरे यांची मोटार सायकल रॅली 

Adivasi samrat logo new website

खारघर-कामोठेत आदित्य ठाकरे यांची मोटार सायकल रॅली 

पनवेल/प्रतिनिधी : 
३३- मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराकरिता शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची मोटार सायकल रॅली गुरुवार ९ मे रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. 
    या दुचाकी प्रचार रॅलीमध्ये सुमारे २०० चालक दुचाकीसह सहभागी होणार आहेत. वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता आदर्श आचारसंहितेचे पालन करिता रॅलीद्वारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवाराचा प्रचार करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी दिली. प्रचार रॅलीचा मार्ग ईको स्टैंड से ३ बेलपाडा खारघर, विठ्ठल मंदिर, एकसिस बँक, नवरंग चौक से.१२, गोखले स्कूल, शिवाजी चौक, शिल्प चौक से २०, डेली बाजार, नीलकंठ स्वीट, वास्तु विहार से-१६, स्पगेटी, घरकुल, कोपरापासून कामोठा शिवसेना शाखा, सत्यकेतु चौक, मनमोहन स्वीट कॉर्नर, गोकुळ डेअरी, सेंट्रल बँक, विस्ता कॉर्नर, हावरे जवळ रॅलीचा समारोप होईल.

adivasi logo new 21 ok (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 + 2 =