IMG-20220317-WA0002
अलिबाग ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड सामाजिक

सानेगाव आश्रमाशाळेतील प्रवेश बांगारे यांच्या मृत्यूची सविस्तर चौकशी करण्यासंदर्भात पञकार गणपत वारगडा यांनी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांची घेतली भेट

सानेगाव आश्रमाशाळेतील प्रवेश बांगारे यांच्या मृत्यूची सविस्तर चौकशी करण्यासंदर्भात पञकार गणपत वारगडा यांनी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांची घेतली भेट

प्रकल्पातील व आश्रमाशाळेतील प्रश्नाविषयी तात्काळ मंञी महोदयांसोबत चर्चा करू – शिरीष घरत, रायगड जिल्हा प्रमुख

खारघर/ प्रतिनिधी :
रोहा तालुक्यातील सानेगाव येथील शासकीय आश्रमाशाळेत शिकत असणारा इयत्ता १२ वी वर्गातील विद्यार्थी प्रवेश बांगारे हा विद्यार्थी शिक्षणात हुशार असतांना देखील त्यांनी परीक्षेच्या एक दिवस अगोदर आत्महत्या केली.
या मृत्यू विद्यार्थ्यांबाबत माहिती मिळाली व चौकशी करण्यासाठी समाजाच्या वतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, अप्पर आयुक्त ठाणे यांच्याकडे वारंवार पञ व्यवहार करूनही काही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा मृत्यू बाबत प्रश्न निर्माण होत असतांना आत्महत्या की हत्या? अशी शंका निर्माण होत राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व आदिवासी समाजाच्यावतीने आदिवासी विकास प्रकल्प पेण कार्यालयासमोर धरणे आंदोलन देखील करण्यात आले.
शिवाय, प्रवेश बांगारे यांच्या मृत्यूंची सविस्तर चौकशी व त्यांच्या कुटुंबाना न्याय मिळण्यासाठी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र अध्यक्ष गणपत वारगडा यांनी बुधवारी (दि.१६ मार्च) रोजी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत व अॅड. विष्णू गवळी यांची भेट घेत मृत्यू विद्यार्थ्यांची घटना सांगितली तसेच मागील वर्षी पेण तालुक्यामधील आश्रमाशाळेतील मृत्यू विद्यार्थ्यींनी शिल्पा शिद यांच्या बाबतीतही अशीच घटना घडल्याचे स्मरण देखील करून दिले. आश्रमाशाळेत वारंवार अशा घटनाच कशा घडताहेत? याला जबाबदार कोण? आदिवासी विकास विभागाचं नियंत्रण नाही का?? असे प्रश्न उपस्थित करत प्रवेश बांगारे आश्रमाशाळेतील मृत विद्यार्थ्यांची सविस्तर चौकशी करा व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र अध्यक्ष गणपत वारगडा यांनी केली आहे.
यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत व अॅड. विष्णू गवळी यांनी घडलेल्या घटना, प्रकल्प कार्यालय व आश्रमाशाळेतील प्रश्नाविषयी लवकरात लवकर मंञी महोदयांबरोबर चर्चा करणार असल्याचे अध्यक्ष गणपत वारगडा यांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

66 + = 76