राजाराम पाटील यांना तात्काळ अटक करा ; अन्यथा ऑल इंडिया पँथर सेना आंदोलन करणार
पनवेल सह्यायक पोलीस आयुक्तांना दिला इशारा…
पनवेल / आदिवासी सम्राट :
आतासा रिसॉर्ट येथे काम करणारी आदिवासी महिलेवर नेरे गावातील राजाराम पाटील यांनी त्यांच्या घरी किरकोळ कामासाठी आतासा रिसॉर्टमधून बोलवून त्या आदिवासी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी त्या पीडित महिलेनी पनवेल तालुका पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याच दिवशी शुक्रवार, (दि.०८ सप्टेंबर) रोजी भारतीय दंड संहिता १८६०, कलम ३५४, ५०९, ५०४, ५०६ व अनुसुचित जाती जमती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ कलम 3(1)(w)(i), 3(1)(w)(ii), 3(2)(va) गुन्हा दाखल केला आहे.
मात्र, गुन्हा दाखल होताच आरोपी राजाराम पाटील हा फरार झाला आहे. परंतु, आरोपीला अटक करण्यासाठी सयाह्यक पोलीस आयुक्त यांनी आरोपीला अटक करण्यासाठी स्पेशल पोलीस यंत्रणेनेला आदेश दिले आहेत. पीडित आदिवासी महिलेला आरोपी राजाराम पाटील व त्याच्या कुटुंबापासून जीवितास धोका आहे. त्यासाठी त्याला अटक करण्यासाठी वारंवार पोलीस अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. पण अध्यापही आरोपी राजाराम पाटील पोलिसांच्या हाती लागला नाही.
१५ दिवस होऊन ही आरोपीला अटक न झाल्याने त्या पीडित आदिवासी महिलेला अखेर न्याय देण्यासाठी संघर्ष नायक दीपक केदार, राष्ट्रीय अध्यक्ष यांची ऑल इंडिया पँथर सेना पुढे आली आहे. येणाऱ्या ३ ते ४ दिवसात फरार आरोपी राजाराम पाटील यांना तात्काळ अटक केली नाही तर सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यलया समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत ऑल इंडिया पँथर सेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख मनोहर कांबळे यांनी पनवेल सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राजपूत व तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन दिले आहे. यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे पनवेल तालुका महिला अध्यक्षा मानसी कांबळे, उपाध्यक्ष सचिन कांबळे, निक्षाताई कोळी, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष, पत्रकार गणपत वारगडा, वामन निरगुडा आदी. उपस्थित होते.