विद्यार्थी गुणगौरव आणि सेवानिवृत्त नोकरवर्गाचा उंबरवाडी ग्रामस्थांनी केला सन्मान
सुधागड पाली/ आदिवासी सम्राट :
रायगड जिल्ह्यातील पाली येथील दुर्गम भागातील उंबरवाडी ग्रामस्थ व नोकरवर्गानी उंबरवाडी गावातील सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षात इ.१० वी व १२ वी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच सेवानिवृत्त नोकरवर्गांचा सन्मान सत्कार सोहळा मंगळवार (दि.१९ सप्टेंबर) रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.जी.डी.हंबीर तसेच उंबरवाडी गाव कमिटीचे अध्यक्ष तथा सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज पाली सुधागडचे उपाध्यक्ष श्री.चंद्रकांत कृष्णा वारगुडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
विद्यार्थांच्या सत्कार सोहळा पार पडत असतांना सेवानिवृत्त सत्कार मूर्ती डॉ. रमेश दामा हंबीर यांचा देखील मान सन्मान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाला नितीश हिरू हंबीर – उंबरवाडी
(सेवानिवृत्त नोकरवर्ग JNPT उरण) हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि विद्यार्थी व सेवानिवृत्त नोकरवर्ग ट्रॉफी, प्रमाणपत्र व सन्मानपत्र तयार करण्यापासून एकूण सर्व कार्यक्रमाचे नियोजन व तयारी उंबरवाडी गावचे मिलिंद जानू वारगुडे (शिक्षक) यांनी व सर्व ग्रामस्थ, नोकरवर्ग यांच्या सहकार्यातून केले. या कार्यक्रमाला कार्यक्षम ग्रामस्थ म्हणून रघुनाथ हंबीर, कुशा वारगुडे, दिनेश वरगुडे, भास्कर वारगुडे, उपस्थिती राहून नितीश हंबीर, जी.डी.हंबीर, रमेश हंबीर, डॉ. वाय.के. वारगुडे, इंजि. उत्तम डोके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नंतर मिलिंद वारगुडे सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.