IMG-20210727-WA0044
उरण कर्जत कोकण ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र रायगड सामाजिक

स्व. बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्यावतीने पनवेल तहसिलकडे धान्य सुपूर्द

स्व. बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्यावतीने पनवेल तहसिलकडे धान्य सुपूर्द

मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बबनदादा पाटील यांचा पुढाकार

ज्येष्ठ शिवसैनिकांच्या उपस्थितीत तहसीलदारांकडे करण्यात आले धान्य सुपूर्द

पनवेल/ प्रतिनिधी :
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळोजे येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्यावतीने रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांच्या पुढाकारातून १००० किलो तांदूळ आणि ३५० किलो मूगडाळ असे धान्य पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. सदर प्रक्रिया ही शिवसेनेच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली.

राज्यात संकटे येण्याची आणि त्याला समर्थपणे सामोरं जाण्याची कसब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिली आहे. नुकत्याच महाड, खेड आणि चिपळूण याठिकाणी अतिवृष्टीचा तडाखा बसून महापुराने आपले विक्राळ रूप दाखवून दिले. यामध्ये अनेक जणांची घरे पाण्यात पूर्णपणे बुडून गेली होती. तसेच घरामधील सर्व सामान पाण्यात वाहून गेले होते. या सर्व नागरिकांच्या मदतीसाठी पनवेलमधील विविध संस्था या त्याठिकाणी पोहोचून जवळपास २५ हजार लोकांना अन्न शिजवून खावू घालत आहेत. त्यांच्या या कार्यात एक खारीचा वाटा म्हणून आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळोजामधील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचे संस्थापक बबनदादा पाटील यांनी १००० किलो तांदूळ आणि ३५० किलो डाळ असे धान्य जमा केले. यावेळी बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज संस्थेचे सदस्य गणेश बबनदादा पाटील आणि दिनेश बबनदादा पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
गेल्या दोन दिवसांपूर्वीच बबनदादा पाटील यांनी खारघर येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या रक्तदान शिबिरावेळी जाहीर केले होते आणि आज त्यांनी जाहीर केलेले कार्य पूर्ण केले. तसेच रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी रायगडमधील सर्व शिवसैनिकांना मदत कार्यात सामील होण्याचे आवाहन केले होते, त्या आवाहनाला जिल्ह्यातील शिवसैनिकांनी स्वीकारले असून सर्वत्र मदतीचा ओघ सुरू झाला आहे. आज पार पडलेल्या या मदत कार्याला शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, उपमहानगरप्रमुख कैलास पाटील, युवासेना जिल्हा समन्वयक नितीन पाटील, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, शहरप्रमुख अच्युत मनोरे, विभागप्रमुख नंदू घरत आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 + 3 =