Img 20230904 Wa0074
ताज्या पनवेल सामाजिक

रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणी

Adivasi samrat logo new website

रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणी

पनवेल/ आदिवासी सम्राट :
पनवेल महानगरपालिकेत नव्याने रुजू होणारे महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षारक्षकांच्या जागी स्थानिक रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणी रायगड जिल्हा सुरक्षारक्षक व बांधकाम कामगार मजदूर युनियन तर्फे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्याकडे करण्यात आली आहे.
IMG-20230904-WA0074पनवेल महानगरपालिकेमध्ये सद्यस्थितीत महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महामंडळाचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येत असल्याचे रायगड जिल्हा सुरक्षारक्षक व बांधकाम कामगार मजदूर युनियनचे सरचिटणीस विनायक गांधी यांना समजले आहे. हे सुरक्षारक्षक तैनात केल्यास रायगड जिल्हा हद्दीतील स्थानिक तथा रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे नोंदीत सुरक्षारक्षक हे कामापासून वंचित तथा बेरोजगार राहतील. त्यामुळे पनवेल पालिकेत सुरक्षे करता लागणारे सुरक्षा रक्षक हे रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातील नोंदीत असलेले स्थानिक भूमिपुत्र घेऊन त्यांना रोजगाराची संधी द्यावी अशी मागणी सरचिटणीस विनायक गांधी यांनी रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन केली आहे.

adivasi logo new 21 ok (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 + 1 =