कर्जत मतदारसंघात किरण ठाकरे यांनी भाजप आणि अपक्ष उमेदवारी असे दोन अर्ज दाखल ..
कर्जत/ प्रतिनीधी :
कर्जत विधानसभा मतदारसंघात सुरू असलेली चढओढीला आला घालण्यासाठी तसेच मतदारसंघात शांतता कायम ठेवण्यासाठी मला आमदार व्हायचे आहे असे अव्हान भाजपचे कार्यकरते किरण ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यापुर्वी आयोजित सभेत बोलताना विधानसभा मतदारसंघात किरण ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष तसेच अपक्ष नामांकन अर्ज दाखल केले आहे .
भाजपचे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे निवडूणक प्रमुख किरण ठाकरे यांच्या वतीने कर्जत येथील रॅायल गार्डन सभागृहात सभेते आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी किरण ठाकरे यांच्या सह भाजपचे नेरळ शहर अध्यक्ष संभाजी गरूड . नेरळ जिल्हा परिषद गट अध्यक्ष संतोष धुळे ,भाजप प्रदेश कार्यकरिणी सदस्य ॲड, ह्रषिकेश जोशी, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रदनेश खेडेकर, कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, भाजप कर्जत तालूका माजी सरचिटणीस संजय कराळे, तालूका उपाध्यक्ष संतोष म्हसकर, नेरळ महिला शहर अध्यक्ष सरध्दा कराळे, मिनेश मसणे, व्यापारी सेल जिल्हा उपाध्यक्ष पंढरी हजारे, सुनील आंग्रें, कार्यकरणी सदस्य रामदास घरत, आजी उपस्थित होते .
तर उमेदवार किरण ठाकरे यांनी या मतदारसंघात महिला सुरक्षित नाहीत. या मतदारसंघात शेतकरी सुरक्षित नाहीत त्यांच्या जमिनी काढल्या जात आहेत. या मतदारसंघात तरूण सुरक्षित नाहीत त्यांचे हातपाय तोडले जात आहेत. तरूण बेरोजगार आहे त्यांच्या नोकरी काढली जात आहे. तरूणांना पक्षात या असे सांगून नोकर्या देण्याची आश्वासने दिली जात आहेत.या मतदारसंघात हूकूमशाही सुरू असून एक म्हणतो घरात घुसून मारू तर दुसरी म्हणतो तूझ्या गावात येथून मारेन असे बोलणे जात असून अन्य दोन उमेदवार जाहीरपणे बोलत आहेत.
पण आपल्याला असे काही करायचे नाही. जनतेला संधी मिळाली तर महिलांच्या डोक्यावरील हंडा हातात आणायचा आहे. आपल्याला बंगले बांधायचे नाहीत तर आपण आहेत त्या कोणाचे घरात देखील घुसणार नाही. मात्र सर्व सामान्य लोकांचे दु:ख समजून घेऊन कर्जत मतदारसंघात शांतात परसथापित ठेरवण्यासाठी निवडणुकीला सामोरे असल्याचे जाहीर केले आहे.