गायिका उषा वारगडा यांचा ई-मेल व युट्यूब चॅनेल हॅक केल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..
पनवेल / प्रतिनिधी :
आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्त्या आणि गायिका उषा गणपत वारगडा यांचा ई-मेल आय.डी. गुरुवार (दि. २७ फेब्रु.२५) रोजी पहाटे ३.०० वाजेच्या सुमारास हॅक केला होता. सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे युट्युब चॅनेलला गाणी लावत असता अकॉउंट डिसाब्लेड झाल्याचे दिसून आले.
तेव्हा युट्युब चॅनेल हाताळणारा मावस भाऊ कैलास मेंगाळ आणि मछिंद्र वाघ या दोघांनाही सांगितले. परंतु, तोपर्यंत हॅकरने ई-मेलचा रिकवर असणारा मोबाईल नंबर हठवून हॅकरने त्याचा मोबाईल नंबर ऍड केला. एवढच नाहीतर युट्युबला उषा वारगडा नावाचा असणारा चॅनेल देखील हटवून s1mple या नावाने नवीन चॅनेल तयार केला गेला आहे. हॅकरच सध्या स्थितीमधील ठिकाण हे अमेरिका देशातला दिसत आहे. शिवाय त्या हॅकरने उषाताई वारगडा यांचे असणारे सर्व गाणी डिलिट केले. आणि त्या अकॉउंटवर गेम खेळणाऱ्या व्हिडिओ दिसू लागल्या.
मात्र, उषा वारगडा यांचा युट्युब चॅनेल हाताळणारा मावस भाऊ कैलास मेंगाळ आणि मछिंद्र वाघ यांनी गुगल, युट्यूबला रिकवरीसाठी ट्विटरवरून ई-मेल केला. काही तासाने ईमेल रिप्लाय आला, परंतु ईमेल आय.डी. रिकवर झाला नाही. नंतर उषाताई वारगडा यांचा ईमेल चा दुरुपयोग होऊ नये, म्हणून ईमेल डिसाब्लेड करण्यासाठी पुन्हा ईमेल केला.
थोडया वेळाने त्या ईमेल आय.डी.वर डिसाब्लेड केल्याचा ईमेल आला. या घटनेची हकीकत सामाजिक कार्यकर्ते गणपत वारगडा, उषा वारगडा हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल येथे जाऊन पोलीस उपनिरीक्षक विष्णू टोणे यांना सांगितले. उषा गणपत वारगडा या सामाजिक कार्यकर्त्या असून त्या मालडुंगे ग्रामपंचायतीच्या सदस्या देखील आहेत. त्यामुळे ईमेल आय.डी.चा दुरुपयोग होऊ नये म्हणून आदिवासी गायिका उषा गणपत वारगडा हिने हॅकरच्या विरोधात शुक्रवार (दि. २८ फेब्रु. २५) रोजी लेखी तक्रार दाखल केली आहे.