२०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन.
माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन
- क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर
——————————–
आदिवासी समाजातील सण, उत्सव, पारंपारिक साधन, क्रांतीकारकाच्या जयंती, पुण्यतिथी यांचा कुठे इतर दिनदर्शिकामध्ये (कॅलेंडर) उल्लेख केलेला नसतोच. एवढंच काय? तर ९ ऑगस्टला जगात साजरा होत असणारा जागतिक आदिवासी दिनाचा सुद्धा उल्लेख अनेक दिनदर्शिकेमध्ये दिसून येत नाही. यासारखे अनेक विचार करणा-या गोष्टी आहेत. म्हणून आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी आदिवासी दिनदर्शिका प्रकाशित करत असतो. त्यामुळे समाजात जनजागृती व प्रबोधन करण्याचा हा एक उपक्रम आहे. त्यामुळे आता आदिवासी दिनदर्शिकेला महत्त्व वाढत असून समाजात आदिवासी दिनदर्शिकेची मागणी अधिक वाढत आहे.
– संपादक, गणपत वारगडा
अध्यक्ष, आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र (रजि.)
————————————–
पनवेल/ प्रतिनिधी :
आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी आदिवासी दिनदर्शिका प्रकाशित होत असते. या वर्षी या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन रायगड जिल्ह्यातील माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पनवेल येथे निवासस्थानी करण्यात आले.
आदिवासी दिनदर्शिका गेल्या ७ ते ८ वर्षापासून नियमित प्रकाशित होत असते. बाजारात अनेक दिनदर्शिका उपलब्ध होत असतात. माञ, ही आदिवासी दिनदर्शिका फार वेगळी पहायला मिळते. या दिनदर्शिकेमध्ये बिरसा मुंडासह अनेक आदिवासी क्रांतीकारक व बहुजन समाजातील समाजसुधारकांचे मोठ्या आकाराचे छायाचित्रे तसेच आदिवासी समाजातील सन, उत्सव, पारंपारिक साधन, जयंती, पुण्यतिथी यांचा विशेष समावेश या आदिवासी दिनदर्शिकेमध्ये संपादक गणपत वारगडा हे उल्लेख करत असतात. त्यामुळे समाजामध्ये या दिनदर्शिकेची मागणी देखील दिवसेंदिवस वाढत जाते, असे माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांनी आदिवासी दिनदर्शिका प्रकाशन करतावेळी सांगितले.
तसेच आदिवासी समाजाचे व्यासपीठ असणारे साप्ताहिक आदिवासी सम्राट व आदिवासी न्यूज अॅण्ड इंटरटेंमेट हे चॅनेल सुद्धा गणपत वारगडा हे योग्य प्रकारे चालवत आहेत. त्यांच्या या कार्यातून समाजात जनजागृती व प्रबोधन होत असते, असे लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर म्हणाले.
यावेळी दैनिक वादळवाराचे संपादक, जेष्ठ पत्रकार विजय कडू, पनवेल टाईम्सचे संपादक गणेश कोळी, संपादक सय्यद अकबर, रायगड टू डे या इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक क्षितिज कडू, सामनाचे पञकार संजय कदम, लोकमतचे पञकार मयुर तांबडे, पनवेल वार्ताच्या संपादिका रूपाली शिंदे, पञकार आनंद पवार, स्टार पनवेलचे संपादक अनिल राय, संतोष वाव्हळ, क्षितिज पर्वचे संपादक सनिप कलोते, राजेंद्र साखरे, श्री. वायदंडे आदी. उपस्थित होते.