IMG-20200122-WA0026
ठाणे ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक

शालेय माॅडर्न पेन्टाथलाॅन खेळाच्या विभागीय स्पर्धा

शालेय माॅडर्न पेन्टाथलाॅन खेळाच्या विभागीय स्पर्धा संपन्न 

पनवेल/ प्रतिनिधी :
क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत शालेय माॅडर्न पेन्टाथलाॅन या खेळाच्या विभागीय स्पर्धा दिल्ली पब्लिक स्कूल नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.
शालेय माॅडर्न पेन्टाथलाॅन या विभागातीय स्पर्धेमध्ये १९ वर्षाय मुले व मुली तसेच १७ वर्षीय मुले व मुली असे १६०० मीटर धावणे आणि २०० मीटर पोहणे अशाप्रकारे वयोगट तयार केले होते. या १९ वर्षीय मुले१६०० मी. धावणे स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे भूषण दळवी यांचा प्रथम क्रमांक आला व पनवेल महापालिका पालिकेचे सिंध्दात बोबडे यांचा दुसरा नंबर आले असून कुणाल जैस्वाल यांचा तिसरा तर शुभम होले यांचा चौथा क्रमांक आला. तसेच १९ वर्षीय मुली वयोगटात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जुई सावंत हीचा प्रथम क्रमांक, साक्षी म्हाञे हिचा द्वितीय व साक्षी जाधव हिचा तृतीय क्रमांक आला.
त्याचबरोबर १७ वर्षीय मुले वयोगटात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचेएक अभिलाश जी यांचा प्रथम क्रमांक, रायगडचे निल वैद्य यांचा द्वितीय, अंशुमन वरिष्ठ यांचा तृतीय तर रोहन अन्सारी यांचा चतुर्थ क्रमांक आला. त्याचप्रमाणे १७ वर्षीय मुली वयोगटातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या उर्वशी बहिरा हिचा प्रथम क्रमांक तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुशी गणञा हिचा द्वितीय क्रमांक, वैभवी भोईटे हिचा तृतीय तर प्राजांली शाही हिचा चतुर्थ क्रमांक आला. तसेच या खेळाडूंची राज्यस्तरीय शाळेय मॉडर्न पेन्टाथलाॅन खेळासाठी निवड झाली असून पुढील स्पर्धा दि. १० ते ११ फेब्रुवारी श्री. छञपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलन जळगाव येथे होणार आहेत.
यावेळी स्पर्धा मुंबई जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयातील क्रिडा अधिकारी श्री. नवनाथ फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असताना या स्पर्धेसाठी मुंबई क्रिडा अधिकारी श्री. अरूण पाटील, दिल्ली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक श्री. मोहिते, मॉडर्न पेन्टाथलाॅन असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष श्री. सुनिल रघुनाथ पूर्णपात्रे, सेक्रेटरी श्री. विठ्ठल शिरगावकर, श्री. नामदेव शिरगावकर, श्रीम. श्रावणी जाधव, श्रीम. सिमा राय, श्री. हर्षद ईमानदार, श्री. यज्ञेश्वर बागराव, श्री. समीर रेवाळे, श्री. यशवंत मोकाशी आदी. स्पर्धेसाठी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

6 + 1 =