20200329 225350
ताज्या मुंबई सामाजिक

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या नावाने स्वतंत्र बँक खात्यात मदत जमा करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आवाहन

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या नावाने स्वतंत्र बँक खात्यात मदत जमा करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आवाहन

मुंबई / प्रतिनिधी :
कोरोना (कोविड 19) विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत असतांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत.
याच प्रयोजनार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले असून बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.
तसेच उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था, धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करणा-या सर्व  संस्था व नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19″ या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात रक्कम जमा करून मद्दत करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

——————————
खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

● Chief Minister’s Relief Fund-COVID 19

● Savings Bank Account number 39239591720

● State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300
——————————

मराठीत-

● मुख्यमंत्री सहाय्यता निधी
– कोविड 19

● बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720

● स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
————————————
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते. 
————————————–