नेरेपाडा गावातील तरुणांनी एकत्र येऊन केला येण्या जाण्याचा रस्ता बंद, बाहेरील व्यक्तीला प्रवेश नाही
पनवेल/ प्रतिनिधी :
कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नेरेपाडा गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावात जाणारा व येणारा रस्ता 31 मार्च पर्यंत बंद केला आहे. त्यामुळे बाहेरील कुणीही गावात येऊ नये अशी विनंती करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूंमुळे सगळीकडे सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. त्यामुळे सर्व जण आपापली काळजी घेत आहेत. नेरेपाडा गावातील नागरिक देखील यात मागे नाहीत. नेरेपाडा गावात बाहेरून कोणीही व्यक्ती किंवा गावातील नागरिकांचे नातेवाईक येऊ नये यासाठी तरुणांनी एकत्र येऊन गावात येणाजाणारा रस्ता बंद केला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. रस्ता बंद करताना किरण शेळके, समीर रोडपालकर, प्रविण म्हात्रे, आर्यन रोडपालकर, सौरभ रोडपालकर, नितेश पाटील, आकाश रोडपालकर, सारंग खुटले, विवेक भगत, नचिकेत रोडपालकर, रोशन रोडपालकर, कुणाल रोडपालकर, विश्वास म्हात्रे, विशाल शेळके, सतीश म्हात्रे, संदीप रोडपालकर, गुरुनाथ पाटील, रोशन म्हात्रे, सुरज रोडपालकर, भूषण रोडपालकर, रोहित म्हात्रे, मयुर तांबडे, अविनाश रोड पालकर आदींनी मेहनत घेतली. गावात कोणी बाहेरील व्यक्ती येऊ नये यासाठी नेरेपाडा गावचे स्टॉप जवळच बंदी केलेली आहे.
……………………………………………..
हा रस्ता बंद करण्यासाठी आम्ही काही तरुण एकत्र आलो होतो.. 1 ते 4 तरुण एकत्र येऊन रस्ता बंद करणे शक्य नव्हते…आम्ही जास्त तरुण एकत्र आलेलो असल्याने याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत.
— गावातील तरुण