IMG-20200323-WA0342
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

जे एम म्हात्रे चारीटेबल संस्थेतर्फे पनवेल आगारातील कर्मचाऱ्यांना जेवणाची व्यवस्था

जे एम म्हात्रे चारीटेबल संस्थेतर्फे पनवेल आगारातील कर्मचाऱ्यांना जेवणाची व्यवस्था

पनवेल/ प्रतिनिधी :
सारा देश कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकलेला असताना, कोरोना व्हायरसशी दोन हात करून लढणाऱ्या जिगरबाज डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस सरकारी कर्मचारी, परिवहन सेवेतील कर्मचारी व अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी या सर्वांच्या त्याग, समर्पण आणि जिद्दीला सलाम करावासा वाटतो.

एकीकडे आपण सर्वजण घरात सुखरूप असताना, रविवारी पासून मात्र ही सारी मंडळी कोरोनाचा मुकाबला करत होती. दिनांक २२ मार्च रोजी ” जनता कर्फ्यु ” देशभर पाळण्यात आला होता. आज दि. २३ मार्च रोजी परिवहन सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल आगारात वस्तीत असलेले बस वाहक आणि चालक आपले कर्तव्य बजावत आपल्या कुटुंबा पासून दूर आहेत. त्यांच्या त्याग आणि समर्पणाची जाणीव ठेवून, जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने, पनवेल आगारातील वस्तीत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
सामाजिक जाणिवेतून काम करणाऱ्या पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते, प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या या कार्याचं, सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 + 1 =