20200330_081330
ताज्या पनवेल रायगड सामाजिक

कोरोनाबाबत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षणास सुरवात; पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती

कोरोनाबाबत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षणास सुरवात; पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती

पनवेल/ प्रतिनिधी :
जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर आजपासुन रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका हद्दीत घरोघरी जावून तपासणी करण्यास सुरवात करण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घेत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे व वैयक्तिक स्वच्छता राखावी. कोरोना विषाणुची लक्षणे जाणवताच जवळील रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती ही त्यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. आतापर्यंत रायगड जिल्ह्यामध्ये परदेश प्रवास करून आलेल्या प्रवाशांची संख्या १०६५ असून एकूण २६ रुग्णांना मुंबई येथील कस्तूरबा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी १८ रुग्णांचे स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. तर इतर सर्वांना घरीच अलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच एका बाधित रूग्णाची उपचारानंतर केलेली चाचणी निगेटीव्ह आल्याने त्यास घरी पाठविले आहे. तर एका पाॅजिटीव्ह असलेल्या रूग्णावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती उत्तम आहे. सध्या परदेशातून पनवेल येथे आलेल्या प्रवाशांना घरी अलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे आणि ज्यांना त्रास आहे, त्यांना आयसीएमआरने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांच्या मार्फत त्यांच्या घरी जावून चाचणी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने या सर्वांची घरोघरी जाऊन करोना संबंधित काही लक्षणे आहेत का तसेच त्यांची प्रकृती कशी आहे याची तपासणी होणार आहे. या कामासाठी विशेष पथके तयार केली आहेत.
परदेशातून आलेल्या नागरिकांनाच आतापर्यंत या आजाराची लागण झाल्याने त्यांच्या तपासणीसाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना केल्या जात असून या प्रवाशांची घरी जाऊन तपासणी करणे हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे पथक तपासणीसाठी घरी आल्यानंतर नागरीकांनी घाबरून जाऊ नये, पथकास सहकार्य करावे, ही तपासणी आपल्या आरोग्यासाठी आणि शहरातील साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

90 − = 89