IMG-20190831-WA0000
कर्जत ठाणे ताज्या रायगड सामाजिक

कर्जत तहसिलदार कार्यालयचा आसणारा ब्रिटिशकालीन पायवाट- रस्ता पावसाळी बनतोय मृत्यूचा सापला —————————- आदिवासींना विविध दाखले मिळविण्यासाठी दगडी पायवाट रस्तावरून ये- जा करतांना विंचू, विषारी सापांचा पत्करावा लागतोय धोका ————————-

  • कर्जत तहसिलदार कार्यालयचा आसणारा ब्रिटिशकालीन पायवाट- रस्ता पावसाळी बनतोय मृत्यूचा सापला
  • आदिवासींना विविध दाखले मिळविण्यासाठी दगडी पायवाट रस्तावरून ये- जा करतांना विंचू, विषारी सापांचा पत्करावा लागतोय धोका
  • कविता निरगुडे यांच्यासह आदिवासी कार्यकर्त्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

कर्जत/ प्रतिनिधी :
कर्जतचे तहसीलदार कार्यालयाचे कारभार हे ब्रिटिश कालीन आसणारी वास्तूमध्येच सद्या चालतो. ही वास्तू थोडक्यात तहसिल कार्यालय हे कर्जत येथील एका उंच टेकडीवर असल्याने या टेकडीवर पोहोचण्यासाठी पुर्वी ब्रिटिश कालीन दगडी पायवाट रस्ता तयार केला होतो व आजही तो दगडी पायवाट रस्ता आहे. तर टेकडीच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी एक डांबरी रस्ता आहे.
माञ, या रस्त्याचा वापर वाहनधारकच जास्त करताना दिसतात. आदिवासी व गरिब जनता या टेकडीवर असणा-या तहसील कार्यालयात जाण्यासाठी या शाॅटकट असणारा ब्रिटिश कालीन दगडी पायवाट रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसतायेत.
परंतु, या टेकडीच्या माथ्यावर असणारी ही ब्रिटिश कालीन वास्तू सद्या तहसीलदार कार्यालयात जाण्यासाठी दगडी पायवाट रस्तावर खुप गवत व जंगली झुडपे वाढल्याने या ठिकाणावरून ये- जा करणा-यांना विंचू, विषारी सापांचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने भविष्यात या धोक्यामुळे कोणाला तरी जीव गमवावा लागण्याची वेळ येवून नये तसेच तहसीलदार कार्यालयात आदिवासींना विविध दाखले मिळविण्यासाठी अनेक वेळा या रस्त्याचा वापर करावा लागतो.
यासाठी त्या दगडी पायवाट रस्ताची देखरेख करून डागडुगी करण्यासाठी आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्या कविता निरगुडे तसेच आदिवासी संघटनचे कार्यकर्ते चेतन बांगारे, प्रकाश शिद, एकनाथ वारघडे, सतीश जाधव, पांडुरंग गावंडे, विष्णू गोरे, अनंता गावंडे, प्रणाली वाघ आदी. पदाधिका-यांनी तहसीलदारांना पञ देवून आदिवासींची व्यथा मांडली.

One thought on “कर्जत तहसिलदार कार्यालयचा आसणारा ब्रिटिशकालीन पायवाट- रस्ता पावसाळी बनतोय मृत्यूचा सापला —————————- आदिवासींना विविध दाखले मिळविण्यासाठी दगडी पायवाट रस्तावरून ये- जा करतांना विंचू, विषारी सापांचा पत्करावा लागतोय धोका ————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

61 − 54 =