बेकायदेशीररित्या बियर विक्री करणाऱ्याविरूद्ध कारवाई
पनवेल/ प्रतिनिधी :
बेकायदेशीररित्या बियरचा साठा स्वतःजवळ बाळगून त्याची विक्री करणाऱ्या एका इसमाविरूद्ध खांदेश्वर पोलिसांनी कारवाई केली आहे.
तालुक्यातील आदई गावात एक इसम राहत्या घराजवळ बेकायदेशीररित्या बियरचा साठा स्वतःजवळ बाळगून त्याची विक्री करीत असल्याची खबर खांदेश्वर पोलिसांना मिळताच त्यांच्या विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून बेकायदेशीर बियरचे दोन बॉक्स हस्तगत केले असून एका इसमाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.