20230717_073851
ताज्या पनवेल सामाजिक

नेरे ते शेडूंग रस्त्याची झाली दुरवस्था

Adivasi samrat logo new website

नेरे ते शेडूंग रस्त्याची झाली दुरवस्था

पनवेल/ आदिवासी सम्राट :
नेरे ते शेडुंग रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत काही ठिकाणच्या रस्त्यावरील डांबर वाहून गेली आहे. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी करून नवीन रस्ता करण्याची मागणी मनसेचे दिनेश काशीनाथ मांडवकर  पनवेल तालुका सचिव, विश्वास पुंडलिक पाटील पनवेल तालुका उपाध्यक्ष, विद्याधर यशवंत चोरघे पनवेल तालुका संघटक, नेरे विभाग अध्यक्ष त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

20230717_073851
       नेरे, आंबिवली, वांगणी, पाली, लोणिवळी, वारदोली, बेलवली ते शेडूंग हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्याचा नाहक त्रास सर्व नागरिकांना सहन करावा लागत आहे. गतवर्षी निवेदन देऊन देखील कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. मागे पत्र देवून जवळ पास एक वर्षाचा कालावधी होत आला आहे. तरी सदर रस्त्याची कोणत्याही प्रकारची कामाची दखल अजूनपर्यंत घेतलेली नाही. तरी या रस्त्याची दुरूस्ती एक महिन्याच्या आत करण्यात यावी अन्यथा नागरिकांच्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी मनसेतर्फे देण्यात आला आहे.

adivasi logo new 21 ok (1)