लोकनेते दि. बा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समिती व सिडको यांची मासहाऊसिंग प्रकल्पासंदर्भात बैठक संपन्न
पनवेल/ प्रतिनिधी :
लोकनेते दि. बा पाटील साहेब सर्व पक्षीय संघर्ष समिती आणि सिडको यांची बैठक दि. 3 जुलै 2020 रोजी सिडको भवन येथे पार पडली. यामध्ये सिडको ने उलवे नोड येथे नव्याने जो मास हाऊसिंग प्रकल्प आणत आहेत. त्याला स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा आणि सर्व पक्षीय समितीचा प्रखर विरोध आहे.
बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, शेलघर या ठिकाणी नव्याने मासहाऊसिंग प्रकल्प आणत आहे. उलवे नोड येऊन 10 ते 12 वर्षे झालेत तरी पण या ठिकाणी कोणत्याही नागरी सुविधा दिल्या गेल्या नाहीत. या मध्ये प्रामुख्याने जलकुंभ, रस्ते, शाळा, गटारे,हॉस्पिटल, मैदाने, समाजमंदिर, व्यायाम शाळा, वाचनालय अशा कोणत्याही नागरी सुविधा अद्याप येथील जनतेला दिल्या गेल्या नसल्याने या ठिकाणची जनता अगोदरच त्रस्त आहे.म्हणून या प्रकल्पाला सर्वांचा विरोध आहे. या सुविधा सिडको ने प्रथम येथील जनतेला दयाव्यात, इथे अनेक वर्षांपासून ची जी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आहे त्याच बरोबर जी काही गोर गरीब लोकांची राहती घरे आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे हात न लावता हा प्रकल्प गावां पासुन दुर करावा. या प्रकल्पाला आमचा विरोध नाही.अशी मागणी आजच्या बैठकी मध्ये प्रामुख्याने करण्यात आली.
त्याच बरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या अश्वारुढ पुतळा त्यामध्ये बाग -बगीचा, शिव सृष्टी तयार करणे या साठी खारकोपर रेल्वे स्टेशनं जवळ 7 एकर जमीन तातडीने हस्तांतरित करून या सर्वांचा नियोजनबद्ध विकास करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याला सिडको अधिकारी यांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिले आणि लवकरात लवकर हि प्रक्रिया आम्ही पूर्ण करणार असा शब्द त्यांनी आजच्या बैठकीत सर्वपक्षीय समितीला दिला.
त्याच बरोबर शेलघर आणि जासई या मध्ये जी खाली जागा आहे त्या ठिकाणी मुंबई मधील घाण (डेब्रिज )खुप मोठया प्रमाणात आणून खाली केली जात आहे. त्याचा स्वरूप आज आपल्याला मोठा डोंगर झालेला पाहायला मिळत आहे. याचा परिणाम येथील जनतेवर होत आहे. मोठ्या प्रमाणात रोग -राई या ठिकाणी पसरत चालेली आहे. Covid 19(कोरोना )सारखा जीवघेणा आजाराला लोक बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी खाली होणारा डेब्रिज कायम स्वरूपी बंद करावा. या ठिकाणी जो डेब्रिज खाली केला जात आहे त्याचा ठेकेदार अस्लम शेख यांचावर ताबडतोब कार्यवाही करून त्याच्यावर गुन्हा नोंदवावा अशी कडक ताकीद आज सिडको अधिकाऱ्यांना या बैठकी मध्ये देण्यात आली.
या बैठकीला लोकनेते दि. बा. पाटील साहेब संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेब, उपाध्यक्ष श्री बबनदादा पाटील, आमदार श्री प्रशांत ठाकूर, आमदार श्री बाळाराम पाटील, आमदार श्री. महेश बालदी, माजी आमदार श्री. मनोहरशेठ भोईर, समितीचे सचिव श्री महेंद्रशेठ घरत, समितीचे निमंत्रक श्री अतुल पाटील, श्री साई देवस्थानचे विश्वस्त श्री. रवीशेठ पाटील, राजेंद्र पाटील, महादेव घरत, सुरेश पाटील . तर सिडको च्या वतीने सिडको चे सहव्यवस्थापक श्री सिंगारे, मुख्यअभियंता डायरकर अपर्णा मॅडम, उलवे नोडचे अभियंता श्री. गोडबोले, एअरपोर्ट चे अभियंता श्री मानकर आदी. अधिकारी वर्ग उपस्थित होते.