images (1)
ताज्या नवी मुंबई नवीन पनवेल पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

लैंगिक छळवणूक केल्या प्रकरणी पॉकसो अंतर्गत गुन्हा दाखल 

लैंगिक छळवणूक केल्या प्रकरणी पॉकसो अंतर्गत गुन्हा दाखल 

नवीन पनवेल / प्रतिनिधी :
अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक छळवणूक केल्याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी रुपेश नाथा म्हस्कर (वय 36 रा. टेंभोडे) याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
images (2)यातील फिर्यादी यांच्या दोन मुली व त्या मुलींच्या चार मैत्रिणी ह्या अल्पवयीन आहेत. आरोपी रुपेश नाथा म्हस्कर याने त्यांचा वारंवार पाठलाग केला व त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आरोपी रुपेश म्हसकर याने फिर्यादी यांची पंधरा वर्षीय मुलगी हीची ओढणी खेचून लैंगिक छळवनूक केली. यात 6 मुली पीडित आहेत. याबाबत आरोपीला एका व्यक्तीने विचारपूस केली असता तुला काय करायचे ते कर, मी तुला बघून घेईन, तू मला बाहेर भेट अशी दमदाटी केली. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.adivasi logo new 21 ok (1)