Img 20200915 Wa0010
ताज्या नवीन पनवेल सामाजिक

मयूर तांबडे यांना कोरोना योद्धाने सन्मानित

मयूर तांबडे यांना कोरोना योद्धाने सन्मानित

आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था व आदिवासी सम्राट वृत्तपत्राने सामाजिक कार्याची घेतली दखल

नवीन पनवेल/ प्रतिनिधी :
दैनिक लोकमतचे पत्रकार मयुर तांबडे यांना आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था आणि आदिवासी सम्राट तर्फे कोरोना सन्मानपत्र ने सन्मानित करण्यात आले आहे. कोरोना काळात तळागाळातील नागरिकांसाठी केलेल्या मदतसाठी या सन्मानपत्रने तांबडे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
मयूर तांबडे यांनी आत्तापर्यंत वृत्तपत्राच्या माध्यमातून विविध सामाजिक व राजकीय गुन्हे, शैक्षणिक, आदी विषययांवर लिखाण केलेले आहे. यावेळी त्यांनी तळागाळातील नागरिकांना न्याय देण्याचे काम केले आहे. तसेच कोरोना या विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी अनेकांना मदत केली आहे. लॉक डाऊनमध्ये त्यांना नेरे येथील योगेश तांबोळी, हॉटेल हॅश किचन, पनवेल येथील प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट, एडवोकेट मनोहर सहदेव, हॉटेल न्यू पंजाब, कलंबोली येथील शैलेश चव्हाण, चिपळे येथील धनंजय पाटील, अजय पाटील, संदीप पोखरकर, उत्पादन शुल्क विभाग, नवीन पनवेल येथील प्रोबीर बोस, नेरेपाडा येथील गुरुनाथ पाटील, कोंडले येथील रवींद्र पाटील, राज शेट्ये, जयेंद्र शेट्ये, अंकिता आंग्रे यांनी जेवण, बिस्कीट, जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली.
यापूर्वी त्यांना बजाज अलियांझ, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन मुंबई, वाल्मिकी समाज, आगरी, कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था आणि आदिवासी सम्राट वृत्तपत्र व चॅनेलच्या तर्फे कोरोना योद्धाने सन्मानित करण्यात आले आहे.