Img 20201101 Wa0006
कोकण ठाणे ताज्या सामाजिक

रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात लवकरात लवकर कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार – नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे

रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात लवकरात लवकर कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार – नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे

पनवेल/ प्रतिनिधी :
रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात लवकरात लवकर कॅबिनेट मध्ये निर्णय घेवू असे आश्‍वासन राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब म्हस्कर,उपाध्यक्ष रमेश पाटील, सरचिटणीस काशिनाथ कांबळे, दीपक बरवी, अनंता पाटील, संतोष पांगत, सुरेश गाताडे, निखिल गाताडे, अविनाश कोंडीलकर आदींनी राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे तसेच रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांची भेट घेतली. त्यावेळी नामदार एकनाथ शिंदे यांनी सांगितले की लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल. तसेच लगेच विभागीय कोकण आयुक्त यांना फोन वरून सूचना केली मागील तत्कालीन मुख्यमंत्रीची बैठक होण्यासाठी सुद्धा शिंदे यांनी शिफारस केली होती. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.