Img 20210226 Wa0058
ठाणे ठाणे ताज्या मुरबाड सामाजिक

आदिवासी शासकीय आश्रमशाळा खुटल येथील विद्यार्थी बेपत्ता!… खुटल येथील शिक्षकांचा निष्काळजीपणा?

शासकीय आश्रमशाळा खुटल येथील विद्यार्थी बेपत्ता

खुटल येथील शिक्षकांचा निष्काळजीपणा?

मुरबाड तालुक्यातील आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष हनुमान पोकळा आक्रमक

मुरबाड/ मोहन भल्ला
विशेष प्रतिनिधी/ मोतीराम पादीर :
शासकीय आश्रमशाळा खुटल मुरबाड या शाळेत शिकत असलेला कु. नरेद्र गोपाळ शेंडे हा विद्यार्थी मु. धारर्खिड, पो . खुटल, ता. मुरबाड जि. ठाणे येथील विद्यार्थी खुटल या शासकीय आश्रम शाळेत शिकत असलेला विद्यार्थी या ठिकाणी आश्रम शाळेत इयत्ता दाहावी मध्ये तिथेच राहूण शिक्षण घेत होता. सदर लेक्चर चालू आसतांनी काही कारणास्तव शिक्षकानी दोन चार जोराची थापड मारली तो विद्यार्थी रागाच्या भरात रात्रीच्या वेळेस कुठे बेपत्ता झाला. अशी शाळेतील विद्यार्थी बोलत होते.
परंतु, 24 तास पहारा या शाळेत आसतानी येथील विद्यार्थी बेपत्ता होतात कसे?? अशा प्रश्न नागरीक करत आहेत. तेथील शिक्षकांचा मनमानी कारभार चालू असल्याचेही बोलले जातेय. पूर्ण एक दिवस ओलांडून तरी या मुलांचा शोध लागत नाही, मुलांचे आई वाडील आक्रोश करत आहेत. आमचा मुलगा आम्हाला शोधून द्यावा! अशी विनंती शासकीय आश्रम शाळा खुटल येथील शिक्षक वर्ग व मुख्यध्यापक यांच्या कडे करत आहे.
सदर घटना मुरबाड तालुका आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष हनुमान पोकळा यांना कळताच हनुमान पोकळा व त्यांचे कार्यकर्त्यांनी विद्यार्थी मिळावा यासाठी शोध मोहीम चालू केली आहे. जो पर्यत या मुलाचा शोध लागत नाही, तो पर्यत मुरबाड तालुक्यातील आदिवासी बांधवव कार्यकर्ते गप्प बसणार नाही. शिवाय, या मुलांच्या पालकांना जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार नाही. असे मुरबाड तालुक्यातील आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष हनुमान पोकळा यांनी ग्वाही दिली आहे.