माणगाव ग्रामपंचायतीकडून अपंगांना ५% निधींचा धनादेश वाटप
नेरळ/ नितीन पारधी :
कर्जत तालुक्यामधील माणगाव ग्रामपंचायतमध्ये ग्रामनिधीतील २८ अपंग व्यक्तींना माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने धनादेश वाटप करण्यात आले.
ही ग्रामपंचायतीची ग्रामनिधीच्या ५% निधीतून प्रतेक अपंग व्यक्ती १००० रू प्रमाणे २८ अपंगांना बुधवार (दि. १७ मार्च) रोजी धनादेशाचे वाटप करण्यात आले. ग्राम निधीतून ५% निधी हा अपंग व्यक्तींना दिला जातो. ग्रामपंचायत हद्दीतील जितके अपंग व्यक्ती आहेत. त्या सर्व व्यक्तीला हा निधीचा लाभ मिळतो. ग्रामपंचायत मधील असलेल्या ८ गावांमध्ये २८ अपंग व्यक्तींना या निधीचा लाभ मिळाला असल्याने अपंग लार्भाथ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी माणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच कल्याणी सारंग कारळे, उपसरपंच तानाजी टोकरे ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र कराळे, कल्पना पारधी, रामदास हिलाल, शरद देशमुख, यशवंत हिलम, मंदाबाई कराळे, संगीता पेमारे, शोभा घारे, भिमाबाई खंडू धुळे, ग्रामसेवक संतोष पवार यावेळी उपस्थित होते.