शिवसेना नेते ना. सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मनसेसह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत जाहिर प्रवेश
पनवेल/ प्रतिनिधी :
आजच्या गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळसाहेब ठाकरे तसेच युवसेना प्रमुख व राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून, शिवसेना नेते उद्योग, खनिकर्म, आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मनसे नवीन पनवेल शहरप्रमुख तसेच इतर पदाधिकारी व भाजप उत्तर भारतीय रहिवासी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेऊन जाहिर प्रवेश केला.
मनसेचे नवीन पनवेल शहरप्रमुख यतिन देशमुख, विभागप्रमुख अविनाश गव्हाणकर, केतन पाटील, सिद्धेश गुरव, अक्षय घाडी, सतिश गायकर, भाजपा उत्तर भारतीय रहिवासी सेलचे अध्यक्ष सि.पी. प्रजापती व सामाजिक कार्यकर्ते जितेश खिळदकर, सुनील जाधव, विकास वारदे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत हाती शिवबंधन बांधून जाहिर प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, उपमहानगर प्रमुख. दिपक घरत, नवीन पनवेल शहर प्रमुख रूपेश ठोंबरे, राजेंद्र भगत तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.