नवी मुंबईतील अबोली महिला रिक्षाचालकांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पावसाळी छत्रीचे वाटप
पनवेल / संजय कदम :
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे नवी मुंबईतील अबोली महिला रिक्षाचालकांना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. दिवसरात्र रिक्षा चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असतात अशा वेळी त्यांना आपल्या कमाईतून पावसाळ्यात छत्री, रेनकोट घेणे म्हणजे एक आव्हान असते याची जाणीव ठेवूनच राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर, संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, नारायण कोळी, सचिव डी. डी. गायकवाड, मंगेश लाड, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, सहसचिव चंद्रकांत धडके मामा, सल्लागार डॉ. गोरख बोबडे, कायदेशीर सल्लागार ऍड.आर.के.पाटील, सहचिटणीस सचिन लोखंडे, अजय येवले, नवनाथ आहिरे यांच्या मार्गदर्शनाने व सहचिटणीस केवल महाडिक यांच्या नेतृत्वात तसेच महाराष्ट्र महिला अध्यक्षा अर्चना पार्टे, कार्याध्यक्षा एमएसडब्लू नूरजहाँ कुरेशी यांच्या सहकार्याने अबोली महिला रिक्षाचालकांना पावसाळी छत्रीचे वाटप करण्यात आले.
यावेळी पनवेल तालुकाध्यक्ष कैलास रक्ताटे,तालुका संघटक ओमकार महाडिक, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, नवी मुंबई महिला अध्यक्षा अर्चना झेंडे, सचिव स्नेहा चांदोरकर, नवी मुंबई वाहतूक सेना अध्यक्षा वनिता कुचेकर, नवी मुंबई ऐरोली विभाग अध्यक्ष कुसुम नागरगोजे, नवी मुंबई सहसचिव शिल्पा पडवळ, मिनाली दसवंत, पारू पाटील, ज्योती राठोड, उषा केंद्रे, पूजा कागडे, मंदा कांबळे, समाजसेविका वनिता बर्फे, रिना गोडसे, कुसुम खंडागळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला रिक्षाचालक उपस्थित होते.