आसल ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांचे पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान
कर्जत/ प्रतिनिधी :
कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीतील भूतीवली कातकरवाडी, चिंचवाडी, सागचिवाडी, पाली धनगरवाडा, बोरिचिवाडी, भूतीवली वाडी, आसलवाडी, नाण्याचामाळ, धामनदंडा या आदिवासी वाडीतील सर्व ग्रामस्थांच्या पावसामुळे भयंकर नुकसान झाले आहे.
भूतीवली कातवरीवाडी संपूर्ण वाहून गेली असून सर्व भातशेती पाण्यामुळे वाहून गेली आहे. या नुकसानी मुळे पुढील काळात येथील आदिवासी लोकांना येणाऱ्या काळात खायचं काय हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कुणाची शेती तर कुणाचे जनावरे वाहून गेले आहेत. खूप भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. याची दखल त्वरित शासकीय प्रशासनाने घेतली पाहिजे. व झालेली नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सर्व ग्रामस्था कडून केली जात आहे.
यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायत सदस्या सौ.वनिता मोहन वारघडे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करत नुकसानग्रस्तांना लवकर लवकर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी त्या प्रयत्न करतात.