Img 20210831 Wa0019
कर्जत ताज्या नेरळ सामाजिक

रेल्वे कर्मचारी विनोद दळवी यांचा प्रामाणिकपणा, विसरलेली पैशांची पर्स महिला प्रवाश्याला केली परत 

रेल्वे कर्मचारी विनोद दळवी यांचा प्रामाणिकपणा,

विसरलेली पैशांची पर्स महिला प्रवाश्याला केली परत 

नेरळ/ नितीन पारधी :
मध्य रेल्वेच्या नेरळ येथील रेल्वे स्थानक फलाट क्रमांक ३ वर बुकिंग ऑफीसमध्ये महिला प्रवासी या घाईघाईत पास घेताना पैशाने भरलेली पर्स आणि त्या मध्ये असलेले डेबिट आणि क्रेडिट कार्ड तिथेच विसरून गेल्या. मात्र हि बाब लक्षात आल्यावर येथिल कर्मचारी विनोद दळवी यांच्या मार्फत ती त्यांना सुखरुप परत करण्यात आली आहे. त्यामुळे नेरळ स्टेशन व परीसरात सर्वत्र रेल्वे कर्मचारी विनोद दळवी (सीसीटीसी)यांचे कौतुक होत आहे.

व्यवसायाने वकील असलेल्या गिताबाई साळुंखे या नेरळ रेल्वे स्थानकावर पास काढत असताना घाईघाईत त्या त्यांची मनीपर्स त्या तेथेच विसरुन गेल्या. अॅड. साळुंखे या तेथुन गेल्यानंतर त्यांची पर्स तेथेच राहील्याचे येथिल सीसीटीसी विनोद दळवी यांच्या ही बाब लक्षात आली. काही वेळाने आपली पर्स विसरल्याचे साळुखे यांच्या लक्षात येताच त्यांनी तेथे येवुन विचारपुस केली असता सदर पर्स त्यांना सुखरुप परत परत करण्यात आली. त्यामुळ ऍड साळुंखे यांनी सीबीएस नेरळ यांना पत्र देवुन रेल्वे कर्मचारी विनोद दळवी यांचा प्रामाणिकपणाचा अभिमान वाटतो असे कळवुन कौतुक केले आहे.

दरम्यान रेल्वे कर्मचारी विनोद दळवी यांचा सारखे कर्मचारी रेल्वे सेवेत प्रामाणिकपणे ईमानईतबारे अशी सेवा बजावत असल्यानेच रेल्वे वरील विश्वास जनतेचा वाढत आहे. अनोळखी व्यक्तींची पर्स मिळालेल्या अवस्थेत सुखरुप परत करणेचे प्रामाणिक कार्य विनोद दळवी यांनी केल्याने त्यांचे संपूर्ण नेरळ शहरात कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

71 − 66 =