IMG-20210801-WA0021
ताज्या पालघर रत्नागिरी सामाजिक

बिरसा फायटर्सच्या एकाच दिवसात 20 नवीन शाखा सुरू

बिरसा फायटर्सच्या एकाच दिवसात 20 नवीन शाखा सुरू

रत्नागिरी/ प्रतिनिधी :
बिरसा फायटर्स संघटनेच्या दिनांक 24/08/2021 रोजी एकाच दिवशी 20 नवीन शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हा शाखा गोंदिया, जिल्हा युवा शाखा गोंदिया, जिल्हा शाखा भंडारा, जिल्हा युवा शाखा भंडारा, जिल्हा शाखा चंद्रपुर,जिल्हा युवा शाखा चंद्रपुर, जिल्हा शाखा वाशिम, जिल्हा युवा शाखा वाशिम,जिल्हा शाखा नागपूर, जिल्हा युवा शाखा नागपूर, विदर्भातील नागपूर विभाग शाखा, अमरावती विभाग शाखा, कोकण विभाग शाखा, नाशिक विभाग शाखा, मराठवाडा विभाग शाखा अशा एकूण 20 नवीन शाखांचा यात समावेश आहे.


नवीन 20 शाखांमुळे बिरसा फायटर्सच्या एकूण 145 शाखा पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे शाखांच्या आकडेवारी नुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी संघटना म्हणून बिरसा फायटर्स संघटनेची ओळख निर्माण झाली आहे.या नवीन 20 शाखांमध्ये अनेक नवीन पदनियुक्ती करण्यात आली आहेत. सुरेशकुमार पंधरे विदर्भ प्रमुख आणि अध्यक्ष, अंकित कन्हाके युवा जिल्हाध्यक्ष भंडारा, भोजराज उईके जिल्हाध्यक्ष गोंदिया,सुशिल पंधरे जिल्हा उपाध्यक्ष गोंदिया, विकास शेडमाके जिल्हाध्यक्ष चंद्रपुर, पांडूरंग कंगाले जिल्हाध्यक्ष भंडारा, व्यंकटसिंग खंडाते कार्याध्यक्ष विदर्भ, इमरचंद भलावी जिल्हा उपाध्यक्ष नागपूर, सुशिल शेडमाके जिल्हाध्यक्ष नागपूर, गोविंद राव कुंभरे कार्याध्यक्ष नागपूर,विनोद कंगाले कार्याध्यक्ष भंडारा, शारदा तुमडाम विदर्भ महिला कार्याध्यक्षा, छाया मडावी महिला विदर्भ अध्यक्ष, पुरण सयाम युवा जिल्हाध्यक्ष गोंदिया, कान्हा कुंजाम कार्याध्यक्ष गोंदिया इत्यादी नवनियुक्त पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.


विदर्भातील सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचे बिरसा फायटर्स राज्य शाखा,विभाग शाखा पदाधिकारी, गांव, तालुका, जिल्हा शाखा पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. बिरसा फायटर्सचे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी सुद्धा पोस्टर्स बनवून नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.बिरसा फायटर्स संघटनेच्या येत्या 1-2 दिवसात 150 शाखा पूर्ण होतील. संघटना दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. याचे सर्व श्रेय बिरसा फायटर्सच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांना आपण देत आहोत. अशी प्रतिक्रिया संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 + 8 =