Img 20210828 Wa0024
कर्जत ताज्या नेरळ सामाजिक

श्रवण विलास भगत या आदिवासी तरुणाला आदिवासी सेवा संघाची आर्थिक मदत

श्रवण विलास भगत या आदिवासी तरुणाला आदिवासी सेवा संघाची आर्थिक मदत

नेरळ/ नितीन पारधी :
कर्जत तालुक्यातील भक्ताचीवाडी येथील 13वर्षीय श्रवण विलास भगत या तरुणाला मैदानात खेळताना गंभीर जखम झाली होती. वडिलांचे छत्र यापूर्वी हरवले असल्याने मोलमजुरी करणारी त्याची आई नामी विलास भगत या श्रवण वर आर्थिक स्थितीमुळे उपचार करू शकत नव्हत्या. दरम्यान, आदिवासी सेवा संघाने त्या तरुणाला आर्थिक मदत करीत उपचाराचा भार उचलला आहे.
आदिवासी सेवा संघाचे पदाधिकारी यांनी भक्ताचीवाडी येथे जाऊन श्रवण विलास भगत या खेळताना पडलेल्या तरुणाची भेट घेतली. मोलमजुरी करणारी त्या तरुणाची आई ला धीर देताना आदिवासी सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी आर्थिक मदत रोख स्वरूपात श्रवण च्या हाती दिली.


यावेळी आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष बुधाजी हिंदोळा तसेच भगवान भगत जिल्हा उपाध्यक्ष, जैतु पारधी अध्यक्ष कर्जत तालुका, गणेश पारधी बेकरेवाडी सचिव रायगड जिल्हा, चंद्रकांत पारधी जुमापटी खजिनदार रायगड जिल्हा, बाळु शिवा ठोंबरे उपाध्यक्ष कर्जत तालुका, नामदेव निरगुडे खजिनदार कर्जत तालुका, विलास भला सचिव साहेब कर्जत तालुका,भाऊ मेंगाळ विभागीय अध्यक्ष कळंब विभाग, सुरेश दरवडा विभागिय अध्यक्ष खांडस विभाग, लक्ष्मण दरवडा मोरेवाडी विभागीय अध्यक्ष पाथरज विभाग, संजय केवारी ताडवाडी विभागिय अध्यक्ष बांगारवाडी ताडवाडी विभाग, सुरेश महादु दरवडा जांभळवाडी विभागीय अध्यक्ष मोरेवाडी मार्गाची वाडी, बबन राहु वारा खांदन विभागिय अधयक्ष भकताची वाडी विभाग, राजेन्द्र निरगुडाभागुची वाडी विभागिय अधयक्ष ओलमण विभाग, प्रसिद्धी प्रमुख मोतीराम भिका पादिर, बाळु आघान, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

6 + 3 =