Img 20211011 Wa0013
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

देहरंग नदीत वाहून जाणा-या मुलीचा स्थानिकांनी जीव वाचवला

देहरंग नदीत वाहून जाणा-या मुलीचा स्थानिकांनी जीव वाचवला

पनवेल/ प्रतिनिधी :
देहरंग येथील नदीवर एक मुलगी कपडे धुण्यासाठी आली होती, तिच्यासोबत तीचा छोटा भाऊ सुद्धा होता. माञ, कपडे धुत असतांना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्या मुलीचे लक्षात न येता, पाण्याच्या प्रवाहाने त्या मुलीला पूर्णपणे पाण्याचा वेढा पडल्याने ती मुलगी प्रवाहाबरोबर वाहून गेली. पुढे ती मुलगी नदीत असणा-या झुडपात आडवली.
परंतु, त्या मुलीला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी कोणाला जाणे शक्य नव्हता. कपडे धुवायला आल्याने कपडे धुवण्याच्या टपामध्ये चार – पाच साड्या होत्या. त्या साड्या एकमेकांना बांधून पाण्यात अटकलेल्या मुलीकडे त्या साड्या पेकल्या आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून रघुनाथ कान्हा चौधरी, चंदर बाळाराम वाघ या स्थानिक ग्रामस्थांनी पाण्यात वाहून गेलेल्या मुलीला वाचवले. यावेळी मालडूंगे येथील वनरक्षक बी. एम. हटकर हे देखील उपस्थित असतांना त्यांची देखील मेहनत महत्त्वाची होती. त्यामुळे येथे जमलेल्या ग्रामस्थांनी रघुनाथ चौधरी, चंदर वाघ व वनरक्षक बी. एम. हटकर यांचे आभार मानले.