IMG-20220922-WA0011
अलिबाग उरण कोकण ताज्या पनवेल रायगड सामाजिक

जात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन

जात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन

एका दिवसात 60 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप

IMG-20220922-WA0010

अलिबाग/ प्रतिनिधी :
उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सर्व ज्युनिअर कॉलेजमध्ये जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मंगळवार, दि. 20 सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी श्री.राहुल मुंडके, तहसिलदार पनवेल विजय तळेकर, उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, रायगड जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्ष डॉ.भरत बास्टेवाड, उपाध्यक्ष रवि किरण पाटील, सदस्य वासुदेव पाटील, पोलीस उपअधीक्षक श्रीमती साधना पाटील यांच्या उपस्थितीत पनवेल तालुक्यात जात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
IMG-20220922-WA0012या शिबिरामध्ये 60 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर त्यांना त्याच दिवशी जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले. या शिबिराच्या नियोजनाकरिता नायब तहसिलदार विनोद लचके, निवासी नायब तहसिलदार श्री.संभाजी शेलार, मंडळ अधिकारी मनोज मोरे, श्री.कांबळे, श्री.भरत जगदाळे, रायगड जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री.योगेश ठाणगे, प्रकल्प सहाय्यक श्री.अक्षय साळवी, श्री.आनंदराव कदम, पनवेल सेतू केंद्र चालक यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. या शिबिरात जात वैधता प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, समाज कल्याण विभागाच्या विविध योजना, कातकरी आदिवासी लोकांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले.

adivasi logo new 21 ok