20191119_120615
ताज्या रायगड सामाजिक

तलाठी संघटनेने केले ; काम बंद आंदोलन

तलाठी संघटनेने केले ; काम बंद आंदोलन

तलाठी सोनावणे यांच्यावर गैरप्रकारे गुन्हा दाखल केल्याने संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी पनवेलच्या तलाठी संघटनेने निषेध म्हणून केले काम बंद आंदोलन


पनवेल/ प्रतिनिधी :
महाड तालुक्यातील कोंझर सजाचे तलाठी सुग्राम सोनावणे यांच्यावर गैरप्रकारे गुन्हा दाखल केल्याने संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज पनवेलच्या तलाठी संघटनेने एकदिवसीय काम बंद आंदोलन छेडून त्यांना पाठींबा दिला.

तलाठी सजा कोंझर, ता. महाड येथील तलाठी सुग्राम सोनावणे यांच्यावर एका सक्षम अधिकार्‍यांची पुर्वपरवानगी न घेता महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी शासकीय कर्तव्य बजाविताना घेतलेले निर्णय व पारित केलेले आदेश या अनुषंगाने पोलीस विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये वरील कायदेशीर तरतुदीचे अवलोकन न करता तसेच वरिष्ठ महसूल अधिकारी यांचे अभिप्राय अथवा परवानगी न घेता पोलीस विभागामार्फत महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला जात आहे अथवा अभिलेखासह चौकशीसाठी वारंवार पोलीस स्टेशनला बोलाविले जात आहे. अशा स्थितीमुळे महसूल यंत्रणेतील कर्मचार्‍यांमध्ये एक भितीचे वाातावरण निर्माण झाले आहे.
तसेच कामकाज करताना अगदी जिकरीचे व कठीण झाले आहे. या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी पनवेलमधील तलाठी संघटनेने एक दिवसीय काम बंद आंदोलन छेडले होते. परंतु, या आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

29 + = 38