पनवेल शहर संघाची राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी सलामी
नवीन पनवेल/ प्रतिनिधी :
ऑल महाराष्ट्र कॅडेट आणि जुनिअर किकबॉक्सिंग २०२१ चॅम्पियनशिप स्पर्धा सुपा – अहमदनगर येथे मोठया उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे आयोजन किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांनी केले व स्पर्धेचे उद्धटन आमदार निलेश लंके व अध्यक्ष निलेश शेलार तसेच मा. नगरसेवक नितीन शेलार तसेच आयोजक राजेश्वरी कोठावले यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार निलेश लंके व अध्यक्ष निलेश शेलार यांनी खेळाडूंना मार्गदर्शन दिले व शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात पहिली युवती आयोजक असे राजेश्वरी कोठावले या आहेत. ज्यांनी उत्कृष्ठ आयोजन करून हा मान सर्वांच्या मनात मिळवला आहे. या स्पर्धेत ३३ जिल्हाचा समावेश असून सुमारे ९३० खेळाडूंनी यात सहभाग नोंदवीला. यात आपल्या पनवेल शहराचा संघ देखील समावेश होता. पनवेलचे अध्यक्ष जयेश चोगले व सचिव दिक्षा जैन यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहर संघाने या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला. २६ खेळाडूंनी सहभाग घेऊन या प्रकारात म्युसिकल फॉर्म, पॉईंट फाईट, लाईट कॉन्टॅक्ट, प्रो फाईट आशा सर्व प्रकारात पनवेल शहरातील खेळाडूंनी उत्कृष्ठ कामगिरी करत आपल्या शहराचे व जिह्याचे नाव उंचावले आहे.
विजयी खेळाडूंची नावे खालील प्रमाणे-
१) मयूरी पिसे – (म्युसिकल फॉर्म) – गोल्ड मेडल
(लाईट कॉन्टॅक्ट) – सिल्वर मेडल
२) अस्मि गुरव – (फुल कॉन्टॅक्ट ) – गोल्ड मेडल
३) आदित्य खंडिजोड – (म्युसिकल फॉर्म) – गोल्ड मेडल
(लाईट कॉन्टॅक्ट) – ब्रॉन्झ मेडल
४) ऋग्वेद जेधे – (पोईंट फाईट) – गोल्ड मेडल
५) शार्दूल सावंत – (पॉईंट फाईट) – गोल्ड मेडल
६) अथर्व कविणकर – (फुल कॉन्टॅक्ट) – गोल्ड मेडल
७) सायली शेडगे – (पॉईंट फाईट) – सिल्वर मेडल
८) अंजली पटणे – (पॉईंट फाईट) – सिल्वर मेडल
(म्युसिकल फॉर्म) – सिल्वर मेडल
९) वेध शेळके – (पॉईंट फाईट) – सिल्वर मेडल
१०) ओम कोकणे – (लाईट कॉन्टॅक्ट) – सिल्वर मेडल
म्युसिकल फॉर्म) – ब्रॉन्झ मेडल
११) समृद्धी तांगडे – (पॉईंट फाईट) – ब्रॉन्झ मेडल
(म्युसिकल फॉर्म) – ब्रॉन्झ मेडल
१२) भाविक भंडारी – (पॉईंट फाईट) – ब्रॉन्झ मेडल
१३) दिप म्हात्रे – (पॉईंट फाईट) – ब्रॉन्झ मेडल
१४) गोवर्धन पुजारी – (लाईट कॉन्टॅक्ट) – ब्रॉन्झ मेडल
१५) आदर्श चव्हाण – (पोईंट फाईट) – ब्रॉन्झ मेडल
१६) वेदांत चव्हाण – (म्युसिकल फॉर्म) – ब्रॉन्झ मेडल
या स्पर्धेत सहभाग म्हणून खालील प्रमाणे खेळाडूंनी दर्शवीला त्यांची नावे खालील प्रमाणे-
१) सोम्या पिंपळे २) शिवानी नांगरे ३) दक्ष पुनिया ४) मंथन गुंड ५) ओम पाटील ६) विग्नेश तांडेल ७) अथर्व नांगरे ८) रोहित कुमार ९) वेध शिवकर १०) जयशनकर शर्मा
या खेळाडूंनी आपला उत्कृष्ठ प्रदर्शन व दमदार कामगिरी दाखवत पदके प्राप्त केली. या संपूर्ण स्पर्धेत मुख्यामार्ग दर्शक मास्टर राजु कोळी,टीम मॅनेजर केदार खांबे, टीम कोच भूपेंद्र गायकवाड, महिला कोच वैष्णवी कोंढाळकर व संतोष मोकल पंच, धनेश शिंगोटे पंच, मंदार चावळकर, महेंद्र कोळी, राजेश कोळी, गोपाळ म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व खेळाडूंनी उत्कृष्ठ कामगिरी बजावली व सर्वत्र पनवेल शहर व रायगड जिल्हात विजयी खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.