Img 20211120 Wa0055
उरण कोकण ताज्या रायगड सामाजिक

पर्यावरण जनजागृतीसाठी उरण ते गोवा सायकल प्रवास

पर्यावरण जनजागृतीसाठी उरण ते गोवा सायकल प्रवास


उरण/ विठ्ठल ममताबादे :
जागतिक पर्यावरणीय प्रदूषण समस्या तसेच समुद्रामध्ये व समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात असलेल्या प्लास्टिक मुळे समुद्रातील विविध जीवांना होणारा त्रास यामुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. त्यामुळे प्लास्टिक बंदी या महत्त्वपूर्ण विषयावर जनजागृती करण्याकरिता उरण ते गोवा समुद्र किनार्‍यावरुन असे 650 किलोमीटर सायकलवरून प्रवास उरणमधील विवेक मेघश्याम भगत व रोहा तालुक्यातील सूरज शरद खांडेकर हे दोन तरुण करत आहेत.


पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी विवेक भगत, सुरज खांडेकर हे दोन तरुण उरण ते गोवा असा सुमारे सहाशे पन्नास किलोमीटर सायकलने प्रवास करण्याचा संकल्प केला. त्यानुसार दिनांक 18/11/2021 रोजी त्यांनी उरण चारफाटा येथून प्रस्थान केला आहे. एकूण 6 दिवसाचा हा प्रवास असून 23 तारखेला ते गोव्याला सायकल वरून प्रवास करत पोहोचतील. जमले तर गोव्या पुढेही काही किलोमीटर सायकल वरून प्रवास करत दक्षिण भारत मध्ये जनजागृती करण्याचा त्यांचा मानस आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण , प्लास्टिकची समस्या यामुळे प्रदूषण विषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवित असल्याचे सायकलस्वार विवेक भगत, सूरज खांडेकर यांनी सांगितले. सदर उपक्रमाचे उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील, उरण सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

25 − 19 =